CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाणे शहरातील परीक्षा केंद्रावर मनाई आदेश-पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी जारी केला मनाई आदेश

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

CRIME BORDER NEWS NETWORK

ठाणे दि.१० :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संघ लोकसेवा आयोग,एनडीअे आणि एनअे परिक्षा व सीडीएस परिक्षा २०२१ रविवार दि.१४ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहेत. एकूण १२ उपकेंद्रावर दोन/तीन सत्रात होणार असून या परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.

ठाणे पोलीस आयुक्त जय जित सिंह यांच्या या आदेशानुसार, दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ०७ वाजेपासून ते सायं. ०६. ०० वाजेपर्यंत हे मनाई आदेश लागू आहेत. या काळात परीक्षा सुरू असताना पोलीस विभागातील प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच परिक्षा केंद्रावरील संबधित प्राधिकृत अधिकारी,कर्मचारी, परिक्षेस बसलेले उमेदवार यांच्या खेरीज अन्य व्यक्तींना केंद्रावर/उपकेंद्राच्या १०० मीटर परीसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ ही दुकाने, सेवा बंद ठेवण्याबाबत व मोबाईल फोन वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.