CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली पश्चिमेतील पेट्रोल पंपाला आग सुदैवाने जीवित हानीटळली माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी केली कारवाईची मागणी

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राजू नगर मधील रागाई माता मंदिराच्या जवळ असलेल्या पेट्रोल पंपाला दि. १६ ऑक्टो २०२१ रोजी शनिवारी दुपारी पेट्रोल चे सॅम्पल काढून ते बकेटमध्ये ठेवताना अचानक बकेट मधील पेट्रोलला आग लागल्याची घटना घडले असून यात सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.

घटना घडल्यावर काही वेळ पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला होता सदर घटनेची माहिती मिळताच अग्निषमक दलाची कुमक या ठिकाणी तात्काळ पोहोचली.अग्निशमन केंद्र डोंबिवली पश्चिमेतील उपस्थित अधिकारी जीवन बोराडे यांच्यासह जवानांनी सदर ठिकाणी आग काही वेळात विझवली त्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली.परंतु या घटनेमुळे पेट्रोल पंप परिसराच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसेच विष्णुनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी धाव घेतली व परिस्थिती जाणून घेतली.

अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणल्याने खूप मोठा अनर्थ टळला जेव्हा पेट्रोल पंपावर आग लागली तेव्हा त्या ठिकाणाहून धुराचे मोठे लोट बाहेर येऊ लागले होते.यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते सदर पंप हा भरवस्तीत आहे त्याच बरोबर पेट्रोल पंपाच्या शेजारी महानगरपालिकेची शाळाही आहे.

या प्रभागाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी क्राईम बॉर्डर शी बोलताना सांगितले की, आमची मागणी होती की डोंबिवली पश्चिमेत पेट्रोल पंप व्हावा परंतु असा भरवस्तीत व्हावा अशी आमची मागणी नव्हती.या पेट्रोल पंपाला दोन वेळा आग लागली आहे .हा पेट्रोल पंप भर वस्तीत असून पेट्रोल पंपाजवळ महानगरपालिकेची शाळा आहे. शाळेच्या शेजारी या पेट्रोल पंपाला कशी काय परवानगी मिळाली ? व ती कोणी दिली? कशाच्या आधारे दिली? असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला असून या प्रकरणी सायंकाळी माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या कार्यालयात काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व नागरिकांनी भेट घेऊन कारवाईची मागणी केली असून तो इतरत्र हलवण्याची हि मागणी केली .

तात्काळ पंप चालकांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी जनतेच्या वतीने माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी मागणी केलेली आहे.तर प्रशासनाने तातडीने पाऊल उचलावे यासाठी ते प्रयत्न करणार आहेत तो इतरत्र हलवण्याची हि मागणी केली .