CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अनैतिक संबंधाच्या संशयावरून हल्ला विष्णुनगर पोलीसांनी ४८ तासांत आरोपीस केले चतुर्भुज

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली : डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात दि.७ ऑक्टोबर २०२१ रोजी एका ३२ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली की ,तिच्या पतीने तिचा मानलेला मुलगा आशिष यादव वय वर्ष २३ याच्यावर चाकुने जीवघेणा हल्ला करून त्याला जखमी केले असून तो पळून गेला आहे.

जखमी आशिषला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्याच प्रमाणे पळून गेलेल्या माझ्या पतीकडून स्वतःच्या जीवाला सुद्धा धोका असल्याचे त्यांनी पोलीसांना सांगितले यासंदर्भात पोलीसांनी चौकशी केली, असता फिर्यादी महिलेने सांगितले की, त्यांचा पती हा माझा मानलेला मुलगा आशिष जानदेव यादव याचेशी अनैतिक संबंध आहेत असा संशय त्यांना होता.फिर्यादी च्या पतीचे नाव रामचंद्र असून त्याचे वय ५० आहे.

या कारणावरून त्यांना माझ्यावर व आशिष वर प्रचंड राग होता त्यांनी दि.६ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास फिर्यादी महिला व आशिष यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून धारदार चाकूने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.सदरच्या गुन्ह्याची गंभीरतेने दखल घेत तसेच फिर्यादीच्या जीवाला धोका असल्याने पाहिजे असलेल्या आरोपी चा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी एपीआय गणेश वडणे , पोलीस हवालदार पाटणकर ,पोलीस कॉस्टेबल कुंदन भामरे ,राम मिसाळ यांचे पथक नेमले व आरोपीला शोधून काढण्याचे आदेश दिले.

एपीआय गणेश वडणे यांनी त्यांच्या खबऱ्यांना कामाला लावून तपास सुरू केला असता तो पळून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले .एवढेच नव्हे तर त्याने आपला मोबाईल बंद करून ठेवल्याने पोलीसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता म्हणून तो कुठे पळून जाऊ शकतो याचा अंदाज घेऊन सदर पथक हे रत्नागिरी येथे त्याच्या गावी जायला निघाले तसेच त्याचे मोबाईल नंबर चे तांत्रिक विश्लेषण केले असता गुन्हा केल्यापासून त्याने मोबाईल बंद केल्यामुळे पोलीसांना त्याचे लोकेशन मिळत नव्हते त्याने मोबाईल बंद केल्यानंतर शेवटच्या लोकेशन च्या आधारे त्याचा माग घेत असताना त्याच्या मूळ गावी पथक जातांना आरोपीने अचानक नवीन सिम कार्ड टाकून मोबाईल चालू केला असता एक कॉल करून पुन्हा मोबाईल बंद केला.

त्यामुळे पोलीसांची तपासाची तपासाची दिशा बदलली व पोलीस पथक हे माणगाव, रायगड येथून परत माघारी फिरले मोबाईलचे लोकेशन व तांत्रिक विश्लेषणावरून तो गुजरात राज्याच्या सीमेलगत पालघर जिल्ह्यातील डहाणू घोलवड या गावाच्या आजूबाजूला तो असल्याचा संशय पोलिसांना आला म्हणून सदर पथक गुजरात सीमेजवळ तपासासाठी केले असता तसेच खबर याच्या माहितीवरून पोलिसांना आरोपी हा तेथे मिळून आला तेथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल खिलारे यांच्या ताब्यात त्याला दिले सदर गुन्ह्याचा तपास हा प्राथमिक स्वरूपात महिला पोलीस उपनिरीक्षक कपिल यांनी केला.

यासंदर्भात पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ परिमंडळ ३, कल्याण एसीपी जयराम मोरे डोंबिवली विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी एपीआय गणेश वडणे , पोलीस हवालदार राजेंद्र पाटणकर,पोलीस कॉन्स्टेबल कुंदन भामरे, पोलीस कॉन्स्टेबल राम मिसाळ यांनी तसेच दुसरे पथकातील पोलीस नाईक भगवान सांगळे,तुळशीराम लोखंडे,सचिन कांगणे यांनी सदरची कारवाई यशस्वीपणे पार पाडली असून नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल खिलारे हे करीत आहेत.