CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ठाणे क्राईम ब्रँच युनिट ३, कल्याण चे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून कामाचा धडाकाच लावला आहे.त्यांच्या खबऱ्यांचे नेटवर्क मजबूत असल्याने व ते स्वतः जातीने हद्दीत लक्ष ठेवत असल्याने बारीक सारीक गुन्हे सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत.
दि.२ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की,कल्याण शीळ रोड,गोलवली एस.जी. मोटर्सच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानातील बैठ्या चाळी जवळ एक व्यक्ती मोटार कार गाडीतून गावठी हातभट्टीची दारू वितरित करण्यासाठी येणार आहे.ही पक्की खबर मिळाल्याने राजपूत यांनी तात्काळ प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना सदर खबर सांगितली असता विलास पाटील यांनी तात्काळ एक पथक तयार केले.
गोलवली एस.जी. मोटर्सच्या समोरील मोकळ्या मैदानाच्या बाजूस गुप्त सापळा रचला आणि ते खबर्याने दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपीची वाट पाहू लागले बराच वेळ झाला होता तरीही सामसुम असल्याने पोलीसांना वाटले की आपला सापडा व्यर्थ जातो की काय? परंतु रात्री साधारणतः साडेअकरा ते पावणे बाराच्या दरम्यान एक हुंदाई कंपनीची मोटार कार एम.एच. ०४ एफ .झेड ४२१ हि गाडी आली आणि पोलीसांना खबर्याने इशारा केला की साहेब याच गाडीमध्ये गावठी दारू आहे.
पोलीसांनी त्या कार चालकाला कुठल्याही प्रकारची संधी न देता चारी बाजूने घेरले व गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गावठी दारूचे फुगे मिळून आले तात्काळ त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण १ लाख १५ हजार ७४०/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. त्याबाबत पोलीस हवालदार मंगेश शिर्के नेमणूक गुन्हे शाखा युनिट ३ कल्याण यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३३ / २१ मुंबई प्रोहिबिशन कायदा कलम ६५ (अ)(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद करण्यात आली.पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या योगेश शालीक देवकर वय वर्षे ३० याच्या अभिलेखाची तपासणी केली असता त्याच्यावर रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन गुन्हे मुंबई प्रोहिबिशन कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्ह्याची नोंद दिसून आली आहे. जप्त मुद्देमाल व ताब्यात घेतलेल्या इसमास पुढील तपास कामी मानपाडा पोलीसांच्या हवाली करण्यात आले.
सदर यशस्वी कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३,कल्याणचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उप निरीक्षक कळमकर पोलीस हवालदार शिर्के, पोलीस शिपाई राजपूत ,वानखेडे , नवसारे यांनी परिश्रम घेतले.