CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाणे वीज चोरी प्रकरणी वीज चोराचा जामीन अर्ज फेटाळला

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

ठाणे : वीज चोरी प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने एका व्यक्तीचा अंतरीम जामीन फेटाळल्याने वीज चोरांमध्ये खळबळ उडाली आहे.जुलै २०२१ मध्ये टोरंट पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी डायघर मोकाशी पाडा येथील असिफ शेख यांच्या कॅबीन बनवण्याच्या गाळ्यात छापा मारून वीज मीटर शिवाय थेट वीज वापरल्या मुळे रूपये ५ लाख १३ हजारांची वीज चोरी पकडली होती.त्यानंतर सदर वीज चोरीची रक्कम भरण्यासाठी असिफ शेख यांना संधी देण्यात आली होती.मात्र वारंवार संधी देऊनही त्यानी त्यात स्वारस्य दाखवले नाही.अखेरीस कंपनी तर्फे असिफ शेख यांच्यावर पोलिस ठाण्यात वीज अधिनियम २००३ च्या कलम १३५ अन्वये वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अटक टाळण्यासाठी असिफ शेख याने ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. सोमवार ४ ऑक्टोबर २०२१ रोजी ठाणे सत्र न्यायालयाने सर्व बाजू तपासून असिफ शेख याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. पुढील कार्यवाही डायघर पोलिस ठाणे करीत आहे.