CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाणे : ठाणे येथे 6 व 7 ऑक्टोबर रोजी होणार क्रीडा नैपुण्य चाचण्या

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

ठाणे : क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक असून क्रीडा व युवक सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्ट्स कंपनी, पुणे येथील प्रवेशाकरिता 6 व 7 ऑक्टोबर रोजी क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

जिल्हास्तरावर चाचण्या ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे दि.6 व 7 ऑक्टोबर रोजी होणार असून रिपोर्टिंगची वेळ सकाळी दहा वाजेची आहे.8 ते 14 वर्षाखालील (फक्त मुले) (दि. 1 जानेवारी 2022 रोजी वय 8 ते 14 वर्ष असणे आवश्यक आहे.) डायव्हिंग क्रिडा प्रकारासाठी - मुलांसाठी - 8 ते 12 वर्ष वयोगट आहे. ॲथलेटिक्स, आर्चरी, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टिंगसाठी वयोगट 10 ते 14वर्ष आहे. यथलॉन वयोगट 13 ते 14आहे. खेळाडूंनी सोबत जन्मतारखेचा दाखला किंवा आधार कार्ड किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटची मुळ प्रत आणावी.

चाचणीस्थळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्यासाठी सामाजिक अंतराचे भान राखतानाच मास्क,सॅनिटायझर इ. साहित्यासह खेळाडूंनी उपस्थित राहावे,चाचण्यांबाबतच्या सविस्तर माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कोर्टनाका, ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी केले आहे.