CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवलीतील पिडितेला न्याय नक्की मिळणार- विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

सामाजिक संस्थांनी पोलिस ठाण्यांमधील भरोसा सेल सोबत काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

ठाणे, : डोंबिवलीच्या घटनेचा पोलिसांकडून योग्यरितीने तपास सुरू असून सर्वच संशयितांना अटक करण्यात आली आहे. लवकरात लवकर चार्टशीट दाखल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असून या घटनेतील पिडीतेला न्याय नक्की मिळेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कल्याण येथे व्यक्त केला.

डोंबिवलीतील घटनेतील पिडीतेची आणि तिच्या कुटुंबियांची उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज भेट घेत पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे आदी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मी आज पिडिता आणि तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला. येणाऱ्या काळात या कुटुंबाला समाजातून सहकार्य मिळेल यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगताना या प्रकरणात पोलिसांनी वेगाने कारवाई करीत संशयितांना अटक केली असल्याचे त्या म्हणाल्या. पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील निर्जनस्थळी पोलिसांची गस्त वाढवावी. रेल्वे पोलिस, स्थानिक पोलिस आणि वाहतूक पोलिस यांनी समन्वयातून कामकाज करावे, असे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी गेल्या वर्षभरात ज्या मुली बेपत्ता झाल्या आणि त्यातील काही पुन्हा कुटुंबात परत आल्या अशांचे समुपदेशन करण्यात यावे. विविध सामाजिक संस्थांनी समुपदेशनासाठी पोलिस ठाण्यांमधील भरोसा सेल सोबत काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर पंधरा दिवसांतून त्यांचा आढावा घेणारी ऑनलाईन यंत्रणा तयार करावी असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले.

महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होण्याची आवश्यकता असून समाजातील अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी सुसंस्कृत नागरिकांनी पुढाकार घेत पोलिसांच्या समन्वयातून प्रयत्न करावेत, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.