CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मूळचा छत्तीसगड येथील राहणारा प्रकाश जोधो सागर यास बेलापूर गावातून बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस सह पनवेल गुन्हे शाखा नवीमुंबई कडून अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई चे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग,सह पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव,अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये व पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुरेश मेंगडे यांनी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते .तसेच विशेष पोलीस महनिरिक्षक (का.व सु.) यांनी ही बेकायदेशीर अग्निशत्रा बाबत कारवाई करण्याकामी वेळोवेळी पंधरवडा घोषित केला होता.
सदर बाबत मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरीधर गोरे,स.पो.नि.प्रवीण फडतरे,पो.उप.नि.वैभव व पथक कारवाई करीत असताना मूळचा छत्तीसगड येथील रहिवाशी व सद्या बेलापूर गावात राहणारा इसम प्रकाश जाधो सागर वय २६ रा.ठी.३०१ वाघमारे बिल्डिंग सेक्टर २० बेलापुर हा ऐकादा गंभीर गुन्हा करण्याच्या हेतूने बेकायदेशीर आगनीशत्र बाळगत असल्याची माहिती पो.उप.निरी. रोंगे यांना मिळाली त्यानुसार बेलापूर परिसरात सापळा लावून नमूद इसमास तब्यात घेतले असता त्याच्या तब्यात एक देशी बनवटीचे पिस्तूल व एक 9mm चे जिवंत काडतूस मिळून आले आहे.
सदर इसमा विरुद्ध NRI पोलीस ठाणे येथे गुन्हा रजी.क्र. २३०/२१ कलम ३,२५ भा.ह.का.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आहे.पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष २ करीत आहे .
सदर कारवाई मध्ये स.पो.नि.प्रविण फडतरे,पो.उप.नि.वैभव रोंगे,सहा.फौ. सुदाम पाटील,पो.ह.अनिल पाटील,रणजित पाटील, रुपेश पाटील,संजय पाटील ,गडगे दीपक डोंगरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -मुख्य संपादक राजेंद्र वखरे ९६१९६३००३५