CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कोचिंग क्लासेस शिक्षकांचे समाज घडवण्यासाठी महत्वाचे योगदान - प्रा. प्रदीप ढवळ

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क): शिक्षकांनी बदलत्या शिक्षण पद्धती प्रमाणे आपणामध्ये बदल घडवणे गरजेचे आहे. नवीन शिक्षण पद्धती ही . योग्य व काळाची गरज यावर आधारीत अजून विद्यार्थी हे त्याचे केंद्रबिंदू आहे. शालेय शिक्षकांप्रमाणे खाजगी कोचिंग क्लासेसचा शिक्षक सुद्धा उच्च शिक्षीत असून तो आहोरात्र मेहनत घेवून समाज घडवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे सरकारी शाळेतील शिक्षकांप्रमाणे खाजगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांचा सन्मान व्हावा असे प्रतिप्रादन लेखक व साहित्यकार प्रा. प्रदीप ढवळ यांनी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळ्याप्रसंगी केले.

कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने सायबा हॉल, लोकमान्य नगर, ठाणे येथे दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कोचिंग क्लासेस मधील शिक्षकांना प्रोत्साहन व सन्मान करण्यासाठी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख, प्रमुख वक्ते साहित्यकार प्रा. प्रदीप ढवळ व प्रमुख पाहुणे म्हणून हिंदूजा हॉस्पिटलचे डॉ. रोहीत पांडे, एज्युकेशनल कंसल्टंट समीर वकारिया होते.

गेल्या वर्षभर आम्ही क्लासेस संचालकांच्या समस्या पत्राद्वारे मुख्यमंत्री ,पालकमंत्री,शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच सर्व नियमांचे पालन करून क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी संघटनेच्या वतीने विनंती करत आहोत परंतु शासन दरबारी त्याची दखल घेतली जात नाही त्याचप्रमाणे क्लासेस मधील शिक्षकांना दुय्यम स्थान देत असल्याची याची खंत उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली.

भविष्यात इतर व्यवसायप्रमाणे सुशिक्षित वर्गाने कोचिंग क्लासेसकडे समाज घडवण्याचे एक माध्यम आणि आपण घेतलेल्या ज्ञानाचा फायदा समाजातील सर्वसामान्य मुलांना देण्यासाठी क्लासेस या व्यवसायात यावे. तसेच शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांना वकील, डॉक्टर, इंजिनियर, याप्रमाणे तरुणांना शिक्षक देखील व्हावेसे वाटले पाहिजे यासाठी शासनाने शिक्षकांना सन्मानाने वागणूक देऊन, खाजगी व शालेय शिक्षकांसाठी एक मोठं व्यासपीठ उभं करून दिले पाहिजे. तसेच भविष्यात कोचिंग क्लासेस च्या शिक्षकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शासनाच्या विरोधात रस्त्यावर देखील उतरण्याची आमची तयारी आहे असे संघटनेचे सचिव सचिन सरोदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या सोहळ्यात क्लासेसच्या 60 शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी क्लासेस संचालक संघटनेचे खजिनदार सुनिल सोनार, सह कार्याध्यक्ष रविंद्र प्रजापती, कायदे विषयक सल्लागार शैलेश सपकाळ, राज्य कार्यकारणी सदस्य अन्वर सय्यद, संतोष गोसावी, आनंदा जाधव सह जिल्हा, तालुका स्तरीय सर्व पदाधिकारी उपस्थित होते.