CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाणे,गुन्हे शाखा यूनिट १ ची उत्कृष्ट कामगिरी

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली(क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क) : भारतात घुसखोरी केलेल्या बांग्लादेशी महिला व् पुरुषांचे बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट तयार करुण,त्यांना परदेशी पाठविणाऱ्या टोळीस ठाणे व सुरत येथून अटककरण्यात आली आहे.

ठाणे गुन्हे शाखा यूनिट १ पथक यांस गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की बांग्लादेशी नागरिकांना परदेशी जाण्यासाठी भारतीय पासपोर्ट तयार करून देणारा बांग्लादेशी घुसखोरी नागरिक हा ठाणे, कळवा, विटावा येथे येणार आहे. या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शहानिशा करून योग्य ती करवाही करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले. या आदेशानुसार ठाणे गुन्हे शाखेचे युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षण प्रफुल जाधव व त्यांच्या पथकाने विटावा कळवा ठाणे या ठिकाणी सापळा लावला व नंतर आरोपी राजु उर्फ फारूख सफी मोल्ला वय २९ वर्षे रा.सुरत या बांग्लादेशी नागरिकास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.नंतर त्यापथकाने कौशल्यपुर्ण चौकशी केल्यानंतर त्या बांग्लादेशी घुसखोर नागरिकाकडे कोणत्याही प्रकारचे वैध प्रवासी कागदपत्रे मिळून आले नाही तसेच तो कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सादर करू शकला नाही.

चौकशी दरम्यान राजु हा अवैध मार्गाने भारत-बांगलादेश सीमेवरून छुप्या पद्धतीने भारतीय सरहद्दीमध्ये प्रवेश केला. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा इसम अनधिकृतरीत्या आल्याचे चौकशी मध्ये निष्पन झाले,तसेच त्याने भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याचे व ते बाळगल्याचे निष्पन झाल्याने त्याच्या विरोधात भारतीय संविधान नुसार अनधिकृतरित्या भारतात प्रवेश केल्याबद्दल सरकारतर्फे कळवा पो.ठाण्याचे पोलीस नाईक दादासाहेब पाटील यांनी गुन्हा दाखल केला. तसेच त्यास न्यायालयात हजर केले.