CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली(क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क) : डोंबिवली शहरातील सावरकर रोड या ठिकाणी जेष्ठ नागरिक सुलभा अनंत दीक्षित वय अंदाजे ८६ वर्षे हया हरवल्या होत्या. त्यांना त्यांच्या नातेवाईकां बद्दल काहीही आठवत नसल्याने त्यांना डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
त्या नंतर तेथील पोलीस उपनिरीक्षक संदीप रामचंद्र एगडे यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांचा तात्काळ शोध घेण्यास सुरुवात केली व नंतर काही तासांतच त्यांचे नातेवाईक मिळून आले या जलदरीत्या कामगिरी बदल संदीप एगडे यांचे पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट, च्या मुख्य विश्वस्त सौ सीमा वखरे यांनी आभार मानले .