CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

केंद्रीय मंत्री कपिल पाटील जन आशीर्वाद

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क): ठाणे जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय मंत्री पदाचा मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. म्हणूनच मोदी है तो मुनकीन है असं सांगत नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी ठाणे जिल्ह्यासह प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ते जन यात्रा प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तर ते पुढे म्हणाले की ठाणे जिल्ह्याचा विकास करून जास्तीत जास्त विकास कामे मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आईलानी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे जन आशीर्वाद रॅलीचे आयोजन कल्याण डोंबिवली परिसरात काढण्यात आले होते. डोंबिवली, शीलफाटा येथून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. शीलफाटा मार्गे देसाई गाव, कटाई, मानपाडा, चक्कीनाका येथून तिसगाव गावदेवी मंदिर येथे तिसाई देवीच्या आशीर्वाद घेऊन जन आशीर्वाद यात्रेची सांगता करण्यात आली. प्रसंगी ठाणे जिल्ह्याला लाभलेला 74 वर्षाचा वनवास नरेंद्र मोदी यांनी कपिल पाटीलाना केंद्रीय पदाचा कार्यभार दिल्यामुळे मोडकळीस आल्याचे देखील कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यात एकही विकास काम पूर्ण होत नसल्याची खंत देखील यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळे अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले. आणि येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला कटिबद्ध राहणार असल्याचे देखील कपिल पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच 2014 मध्ये मी रस्ता भटकलो आसतांना देवेंद्र फडणवीस यांनी मला योग्य रस्ता दाखवून भाजपच्या रस्त्यावर आणून ठेवले, म्हणून मी आज ग्रामपंचायत समिती सदस्य ते खासदार आणि आज केंद्रीय मंत्री झालो याचा मला अभिमान आहे. असे कपिल पाटील यांनी सांगितले.