CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
बोईसर (क्राईम बॉर्डर-न्यूज नेटवर्क): - कोणताही व्यवसाय करायचा तर मेहनत, कल्पकता आणि पैशांची साथ मिळाली तर तो बिझनेस यशस्वी होऊ शकतो हे पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या कौटील्यकर दांपत्याने दाखवून दिले. कोरोना काळात सगळीकडे उद्योग, नोकरी ठप्प होऊ लागले असताना आपल्याकडील शिवणकलेचे कौशल्य वापरून कौटील्यकर दांपत्याने नवउद्योजक म्हणून चांगले काम केले. एकीकडे कोविड १९ मुळे बेरोजगारी, मंदीचे संकट उभे राहिले असताना याच कोविडमुळे नवीन उद्योगाचे दार देखील खुले झाले आहे.
बोईसरची कविता कौटील्यकर हिची कहाणी देखील अशीच आहे. एका खाजगी कंपनीत कामाला असलेल्या कविताला महिन्याला १५ हजार रूपये पगार होता. नवरा देखील दुसरीकडे कमी पगाराची नोकरी करीत होता. मात्र लॉकडाऊन सुरू झाले, कोराना पसरू लागला आणि कविताची नोकरी देखील सुटली. नवरयाचा पगार देखील कंपनीने अर्धाच केला. कमी पैशात घर चालवताना दोघांचीही ओढाताण सुरू होती. नवीन नोकरी तर मिळणार नाही, ही परिस्थिती अजून किती काळ राहील काही कल्पना नाही, त्यातून काहीतरी व्यवसाय करावा असा विचार कविताच्या मनात आला. कविताला शिवणकलेचे ज्ञान होते. तिने सध्याच्या मार्केट सर्व्हे सुरू केला आणि तिला जाणवले की, आत्ताच्या कोरोना काळात कापडी मास्क सगळ्याना हवे आहेत. हे मास्क जर आपण बनवून बाजारात विकले तर, नक्की फायदा होईल असा विश्वास दोघाना वाटला. पण पुढे अडचण होती ती व्यवसायासाठी लागणारे सामान व शिलाई मशीन कशी विकत घ्यायची. कविताच्या नवरयाने तिला नवीन उद्योग सुरू करावा यासाठी प्रोत्साहन दिले आणि उन्नती मायक्रोफिन प्रा. लिमिटेड कंपनीकडून लघु उद्योगाला कर्ज म्हणून ४० हजाराचे कर्ज घेतले. कंपनीने देखील कौटीलकर दांपत्याची जिद्द पाहून कर्जपुरवठा केला. त्यातून त्यानी दोन शिलाई मशीन व मास्क बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल विकत आणला आणि मास्क बनवून त्याची विक्री सुरू झाली. आज कविता कौटील्यकर ही यशस्वी उद्योजक बनली आहे.
डोक्यात कल्पना होती, मेहनत करायची तयारी होती. मात्र कोणाकडे मदतीसाठी हात देखील पसरायचा नव्हता अशा वेळी उन्नती मायक्रोफिन मदतीला आले आणि कमीतकमी कागदपत्रांद्वारे विनाकारण विलंब न करता आम्हाला जी ४० हजाराच्या कर्जाची मदत केली, त्यामुळे आम्ही आमचा उद्योग सुरू करू शकलो असे कविता कौटील्यकर यानी सांगितले. उन्नती मायक्रोफिनच्या माध्यमातून नवउद्योजकाना मदतीचा हात दिल्याने आजमितीस ५० हजारहून अधिक नवउद्योजकाना त्याचा फायदा झाला आहे. उन्नती मायक्रोफिन ही महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या अग्रगण्य NBFC-MFI पैकी एक आहे. गरीब कुटुंबांना सूक्ष्म पतपुरवठा सुलभ करून त्यांची आर्थिक स्थिती उंचावण्याच्या दृष्टीने कंपनीची स्थापना करण्यात आली. कंपनीने अनेक स्थानिक महिला उद्योजकांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांची स्वप्ने साकार करण्यास मदत केली आहे. उद्योगाच्या आकडेवारीनुसार, 31 मार्च 2021 पर्यंत एकूण मायक्रोफायनान्स कर्ज पोर्टफोलिओ INR 2,59,377 कोटी आहे. 5.93 कोटी अद्वितीय कर्जदार (ज्यात 99% अधिक महिला आहेत आणि ज्यांच्यापैकी बहुतेक त्यांच्यासाठी ही पहिली क्रेडिट सुविधा असेल. मायक्रोफायनान्स उद्योग 27 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1,19,634 कर्मचाऱ्यांसह 14,673 शाखांच्या नेटवर्कसह कार्यरत आहे.