CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ज्वेलर्सची फसवणूक करणाऱ्या भामट्यांस ठाणे क्राईम ब्रांच युनिट ३,ने २४ तासात ठोकल्या बेड्या

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

CRIME BORDER : RAJENDRA VAKHARE

डोंबिवली (क्राईम बॉर्डर टीम) : हल्ली कोण कसा वागेल? याचा भरवसा राहिलेला नाही.काहीही काबाड कष्ट न करता मौजमजा कशी मारता येईल याकडे आळशी लोक वळतांना दिसतात.जिकडे तिकडे चोर,लफंगे लोकांना फसवणारे वाढत असल्याचे आपल्याला वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पहायला मिळतात.अशा या बदमाश लोकांमुळे चांगल्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.हे बदमाश लोक प्रत्येक वेळेस आपले कु-बुद्धिचातुर्य वापरून लोकांना फसवतात ते आपले राहती जागा सोडून दुसऱ्या शहरात लोकांची फसवणूक करतात आणि ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी सहाजोक पणाचा आव आणतात.परंतु अशा लबाड लोकांची लफडेगिरी,एक ना एक दिवस जगासमोर येते.

असाच एक प्रकार डोंबिवली मध्ये घडला आहे.यावेळेस एकटा-दुकटा माणूस फसला नाहीतर डोंबिवलीतील हुशार ज्वेलर्स फसला.त्याचे झाले असे की,एक इसम हा २९ जुलै २०२१ रोजी डोंबिवली येथील नार्वेकर ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये आला व त्याने आपल्याला सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत असे सांगितले .त्याने ज्वेलर्स ला सांगितले की,माझ्या बँकेतून मी एन ई एफ टी द्वारे पैसे पाठवले आहेत असे म्हणून त्याने खोटे मेसेज दाखविले ज्वेलर्सनेही ते मेसेज बघितले.दुकानदारांला एन ई एफ टी द्वारे पैसे पाठवल्याचे त्याला दिसले मग त्याला हवे असलेले सोन्याचे दागिने त्या दुकानातून खरेदी केले त्यानंतर त्याने खरेदी केलेल्या सोन्याच्या बदल्यात ४,७३,०००/- रुपयांचा एक बनावट धनादेश त्यांना दिला आणि तेथून तो पसार झाला.

हा अनोळखी इसम गेल्यानंतर दुकानदाराच्या लक्षात आले की,आपल्याला त्याने फसवले आहे बरं तो अनोळखी असल्याने त्याच याबाबत काहीही माहिती त्यांना नव्हती.तात्काळ नार्वेकर ज्वेलर्स यांनी ताबडतोब पोलीस ठाणे गाठले व सदर प्रकार पोलीसांना सांगितला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्यात दि.२९ जुलै २०२१ रोजी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली,आणि त्यांनी तपास सुरू केला.

ठाणे क्राईम ब्रँच युनिट-३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन हे स्वतः व त्यांचा स्टाफ त्यांच्या हद्दीत डोळ्यात तेल घालून असामाजिक तत्त्वावर लक्ष ठेवून असतात कल्याण व डोंबिवली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही गुन्हे घडले तर तात्काळ ते समांतर तपास सुरू करीत असतात क्राईम ब्रँच युनिट-३ मध्ये काही अनुभवी अधिकारी व कर्मचारी आहेत.त्यांना त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा होत असतो.त्यांनी त्यांच्या खबऱ्यांचे नेटवर्क मजबूतपणे तयार केलेले आहे.हद्दीत दिवसाढवळ्या नार्वेकर ज्वेलर्सला फसवल्याचे वपोनि.संजू जॉन यांना समजले त्यांनी सविस्तर माहिती घेऊन समांतर तपास सुरू केला ज्वेलरीच्या दुकानात बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज मध्ये ज्या व्यक्तीने फसविले आहे ती व्यक्ती दिसताच ज्वेलर्सने त्या व्यक्तीबद्दल पोलीसांना माहिती दिली.पोलीसांनी सदर इसमाचे छायाचित्र काढून त्यांच्या खबऱ्यांना माहिती काढायला सांगत स्वतःही त्यांनी तपास आरंभला.

आणि शोध सुरू झाला एका भामट्याचा....पोलीस पथकाला सदर इसमाचा मोबाईल नंबर मिळाला त्यांनी त्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण आरंभले.गुन्हा घडून काही तासच झाले होते पण त्यांनी फुटेज व मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषणावरुन सदर भामट्यांचा शोध आरंभला.पोलीसांना खबर्‍याने माहिती दिली कि,सदर इसम हा अंबरनाथ येथे राहणारा असून त्याचे नाव विनय राजेश लोहिरे असे असून तो अंदाजे ४० शी च्या वयाच्या असावा अशी माहिती खबर्‍याने दिली.

सदर कामगिरीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि.संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले.त्या पथकात एपीआय दायमा,पीएसआय मुदगुन, कळमकर,एएस आय मालशेटे,पो.हवा.दत्ताराम भोसले,राजेंद्र घोलप,राजेंद्र खिलारे,थेरे,पवार, पाटील,पो.ना.निकुले,बांगरा पो.शि.राठोड शेकडे राजपूत यांना घेण्यात आले.या पथकांस वरिष्ठांनी मार्गदर्शन करत काही सूचना दिल्यावर सदर भामट्याला पकडण्यासाठी अंबरनाथ येथे गुप्त सापळा रचला आणि त्या सापळ्यात तो अलगद अडकला ‌त्याला त्याचे नाव,गाव,पत्ता विचारला असता त्याचे नाव विनय राजेश लोहिरे वय ३८ वर्ष राहणार अंबरनाथ जिल्हा ठाणे असे समजले.

त्याला पोलीस ठाण्यात आणले असता तो सुरुवातीला नन्नाचा पाढा वाचत होता.परंतु त्याला खास पोलीसी पाहुणचार दिला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.पोलीसांनी त्यांना प्राप्त झालेल्या फुटेजची माहिती त्याला दिली असता आपण कोणतीही माहिती पोलीसांपासून लपवू शकत नाही आपले खरे बोलण्याचं हित आहे हे त्याने ओळखले व आपला गुन्हा कबूल केला.त्याने आपण गुन्हा कसा?का? व कधी? केला याची इत्यंभूत माहिती पोलिसांना दिली तो यासाठी कोणती मोडस ऑपरेंडी वापरत होता हेही सांगितले.

ठाणे क्राईम ब्रँच कल्याण युनिट-३,च्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत या भामट्याला गजाआड केले आणि गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदर कामगिरी ही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली वपोनि.संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली एपीआय दायमा,पीएसआय मुदगुन,कळमकर,एएसआय मालशेटे,पो.हवा.दत्ताराम भोसले,राजेंद्र घोलप,राजेंद्र खिलारे,थेरे,पवार,पाटील,पो.ना निकुले,बांगरा,पो.शि.राठोड शेकडे,राजपूत यांनी अथक परिश्रम घेतले.