CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

दिव्यात नालेसफाई झाली नसल्याने पहिल्याच पावसात नागरिकांच्या घरात पाणी घुसले, दोषींवर कारवाई करा- रोहिदास मुंडे

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

दिव्यात नालेसफाई झाली नसल्याने पहिल्याच पावसात नागरिकांच्या घरात पाणी घुसले, दोषींवर कारवाई करा- रोहिदास मुंडे

क्राईम बॉर्डर:बापू सदाशिव वैद्य

दिवा : गटारांचे योग्य नियोजन नसल्याने व नालेसफाई झाली नसल्याने पहिल्याच पावसात दिव्यातील घरात पाणी घुसले आहे.अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे अशा स्थितीत कोणत्याही दुर्घटना घडू नयेत यासाठी पालिकेने येथील रहिवाशांची राहण्याची व्यवस्था करावी त्याच बरोबर नालेसफाई ची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

दिव्यात नालेसफाई च्या नावाने नेहमीच हात सफाई होत असल्याचा आरोप होत असतो,यावेळी पालिकेने दिव्यात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे केली आहेत मात्र पाणी जाण्यासाठी गटारे नीट केली नसल्याने त्याच बरोबर मुख्य नाल्यांची सफाई झाली नसल्याने पहिल्याच पावसात बैठ्या चाळीत गटारांचे व नाल्याचे पाणी घुसण्याचे प्रकार दिव्यात घडले आहेत.पावसाचे पाणी,व गटारांचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून नालेसफाई न करणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रोहिदास मुंडे यांनीं केली आहे.