CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवलीतील मनसेत मोठे खिंडार बडे नेते शिवसेत

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंंबिवली:(क्राईम बॉर्डर): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापनेपासून पक्षासाठी एकनिष्ठ काम करणारे मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी काल दि.१ फेब्रुवारी २०२१ शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पालक मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मलबार हिल येथील नंदनवन येथे जाहीर प्रवेश केला.

यामुळे डोंबिवलीतील मनसेमध्ये मात्र मोठे खिंडार पडले आहे विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश केल्याने मनसेला मात्र राजकीय धक्का सहन करावा लागणार असल्याची चर्चा सध्या कल्याण डोंबिवली मध्ये रंगू लागली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण मधून मनसेचे आमदार राजू पाटील निवडून आल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे एक खाते उघडले गेले मात्र त्यानंतर दोन वर्षातच डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकाऱ्यांनी उपाध्यक्ष राजेश कदम यांनी मनसेच्या इंजिन मधून उतरुन शिवधनुष्य हाती घेतले आहे