CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (क्राईम बॉर्डर) : ३२ वा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत आर एस पी युनिट व स्वधा फाउंडेशन च्या वतीने मुरबाड येथे एमआय डि सी हॉल मध्ये मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आर एस पी कमांडर मनीलाल शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते अविनाश पवार उपनिरीक्षक निकम साहेब पोलीस हवलदार नीचीते यांच्या प्रमुख उपस्थितीत वाहन चालकांसाठी मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत स्वधा फाउंडेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर इव्हा अथाविया यांच्या तर्फे रोड सेफ्टी मंथ च्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत मुरबाड येथे रिक्षा चालक चालक व बस चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते यावेळी २००/२५० वाहनचालकांनी या शिबिराचा लाभ घेतला,यावेळी निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी या उपक्रमाबाबत आर एस पी टीमचे व स्वधा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले व वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून आपली व परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे लेन कटिंग करून अपघाताला आमंत्रण देऊ नये असे आवाहन केले आर एस पी कमांडर अनिल शिंपी यांनी यावेळी बोलताना सांगितले की समाजातील प्रत्येक नागरिकाने वाहन चालवताना नियम पाळणे आद्य कर्तव्य समजावे आणि आपल्या सोबत इतरांनाही वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जागृत करावे व 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये असे आवाहन केले. के टीव्ही पत्रकार भरत दळवी यांनी या कार्यक्रमाचां माध्यमातून वृत्तपत्रां द्वारे आणि प्रसारमाध्यमांच्या सहकार्याने घराघरातून रस्ते अपघात कमी करण्यासंबंधी जनजागृती करणे गरजेचे आहे असे सांगितले. कर्जा कला पथकाद्वारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मोलाच्या संदेश दिला. आर एस पी अधिकारी शिक्षक मिलिंद कळदकर,मोनाली रॉय,दावांश रॉय,रोहिणी म्हसे, सर्व्हे मॅनेजर भोईर, सूत्रसंचालन मृणाल मॅडम यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे रोहिणी यांनी आभार मानले