CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवलीत बायकोची गळा कापून निर्घुण हत्या

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली ( क्राईम बॉर्डर ) : बायको गावाला येत नाही याचा राग आल्याने पतीने घरातच बायकोचा सुरीने गळा कापून निर्घुण हत्या केल्याची घटना घडली.शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील शिल्पा बारच्या पाठीमागील हरी ओम चाळ चाळीत घडली.हत्या केल्यानंतर पतीने टिळकनगर पोलीस ठाण्यात फोन करून सदर घटनेची माहिती दिली.ताबडतोब पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन हत्या करणाऱ्या पतीला बेड्या ठोकल्या.क्षुल्लक कारणावरून झालेल्या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवकुमार सरजू यादव ( ४१ ) असे पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथील शिल्पा बारच्या पाठीमागे , हरी ओम म्हात्रे चाळीत राहणारा आरोपी शिवकुमार हा कोसळा विक्रेता आहे.तर त्याची बायको मनीषा यादव हिचा सुरीने गळा कापून हत्या केली होती.शिवकुमार हा तापट स्वभावाचा असल्याने त्याला लगेच राग यायचा.शिवकुमारला बायकोबरोबर गावी जायचे होते.मात्र तिने गावी जाण्यास नकार दिलेल्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.काही वेळातच शिवकुमारच्या डोक्यात राग गेल्याने त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता स्वयंपाकघरातील सुरीने मनीषाच्या गळ्यावर वार केला.यात मनीषा जागेवरच कोसळली. रक्ताच्या थोरोळ्यात जमिनीवर पडलेल्या मनीषाचा जागीच मृत्यू झाला.काही वेळाने राग शांत झाल्यावर आपल्या हातून बायकोची हत्या झाल्याने त्याने टिळकनगर पोलीसांना फोन करून घडलेली घटना सांगितली.पोलीसांनी घटनास्थळी जाऊन शिवकुमार यादव याला अटक केली आहे .