CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : (क्राईम बॉर्डर- रिपोर्टर) : गेली चाळीस वर्षांपासून खोणी ग्रामपंचयतीवर शिवसेनेचाच भगवा होता आहे. काही थोडा कालावधीसाठी सोडला तर येथील मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात मते टाकली आहेत. धर्मवीर आनंद दिघे, शाबीरभाई शेख, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या सर्वांनी खोणी ग्रामपंचायतीवर नेहमी प्रेम केले आहे. या सर्वांच्या माध्यमातून खोणी गावात विकासाची कामे परिपूर्ण झाली आहेत. त्यामुळे आताही खोणी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची रेष आहे असे ठाम मत शिवसेना ग्रामीण तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केले.
ग्रुप ग्रामपंचायत खोणी, वडवली ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात ‘गावाचा विकास हाच आमचा ध्यास, आता बदला नको बदल हवा’ या विचाराने शिवसेना पुरस्कृत जय गांवदेवी महाविकास आघाडी पॅनलच्या उमेदवरांच्या प्रचारासाठी प्रचारफेरीत म्हात्रे बोलत होते. यावेळी उप-तालुका प्रमुख बदू पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य किरण ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनी प्रचारात हजेरी लावली होती.
यावेळी किरण ठोंबरे म्हणले कि, शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार दरबारी गेल्या आहेत. त्यासाठी आंदोलाने झाली. या आंदोलनामुळे काही जणांनी कारावास भोगला त्यांचातील काही उमेदवार आम्ही दिले आहेत. आंदोलनात राजकारण झाले पण आम्ही डगमगलो नाही. काही जण म्हणतात विकास केला पण तो कशामधून केला असा प्रश्न किरण ठोंबरे यांनी विरोधकांना यावेळी विचारला. यावेळी माजी सरपंच गणेश ठोंबरे म्हणाले, गावचा विकास असा करू कि मोठ्या शहराचाही विकास झाला नसेल अशी कामे करणारे उमेदवार आम्ही निवडणुकीत उभे केले आहेत. तर बंडू पाटील म्हणाले, या गावचा चेहरा-मोहरा शिवसेनेमुळे बदलेला आहे. येथील ग्रामस्थांनी ठरवलं आहे कि प्रचंड बहुमताने गावदेवी पॅनलला निवडून आणायचं आहे.