CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

शिवाजीनगर पो. स्टे. व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन तर्फे वीट भट्टी कामगारसाठी विशेष कार्यक्रम संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

अंबरनाथ (क्राईम बॉर्डर- रिपोर्टर) : शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ), तसेच क्राईम बॉर्डर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रेझिंग डे व पत्रकार दिनाचे औचित्य साधून वीट भट्टी कामगार व त्यांच्या मुलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे सपोनि. श्री . जयेंद्रकुमार भोयर होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सीआरडब्ल्यूए चे महाराष्ट्र स्टेट कमिटी मेंबर श्री . नितीन सैद हे होते .पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून श्री गणरायाला व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे परिमंडळ - ४ चे डीसीपी प्रशांत मोहिते , एसीपी विनायक नरळे ,अबंरनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. मधुकर भोगे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. जयेंद्र भोयर यांनी व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (सामाजिक संस्था), व क्राईम बॉर्डर (साप्ताहिक) चे संस्थापक राजेंद्र वखरे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यावेळी अंबरनाथ तालुक्यातील वीट-भट्टी वर काम करीत असलेले मजूर व त्यांचे कुटुंब त्यांची मुले व मुली यांच्यासाठी थंडीपासून बचाव व्हावा करिता ब्लँकेट आणि मुला-मुलीसाठी शालेय वस्तूंचे व खाऊचे वाटप करून. मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी तसेच वीट-भट्टी वरील मजुरांना व्यसनापासून होणारे तोटे सांगून व्यसनमुक्तीवर प्रबोधन करण्यात आले. यावेळी ब्लँकेट आणि मुला-मुलीसाठी शालेय वस्तूं व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाची प्रस्थापना राजेंद्र वखरे यांनी केली . यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना सपोनि.जयेंद्र भोयर यांनी वीट-भट्टी कामगार व मुलांना त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देत , व्यसनमुक्ती , बालविवाह , अंधश्रद्धा ,आरोग्याची काळजी ,महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करत पोलिसांबद्दल त्यांच्या मनात विश्वास निर्माण केला .

कोरोना च्या महामारीत स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी दोन व्यक्तीत सहा फूट अंतर राखणे , आपले हात साबणाने स्वच्छ धुणे ,खोकलतांना ,शिंकताना तोंडाला रुमाल लावणे , कोरोनाची भीती न बाळगता काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले . तर समाजसेवक बाळकृष्ण राणे यांनी आर्थिक बचत कशी करावी या बाबत माहिती दिली .

सदर कार्यक्रमाला बोहनोली परिसरातील वीटभट्टीवर काम करणारे स्रिया , पुरुष व मुले मुली यांना विशेष कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते. सपोनि.जयेंद्र भोयर ,भागवत , पो.उप.नि. सुहास पाटील ,पो.हवा. अर्जुन जाधव ,पो.ना. ठाकरे ,पो.शि . दादा वाघमारे ,अवसरे ,पोलीस पाटील बाळाराम उघडे ,वीटभट्टी मालक प्रविण पाटील,जगदीश पाटील ,राजेंद्र वखरे ,महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा सौ . सीमा वखरे , वेब एडिटर शिवम वखरे , महाराष्ट्र स्टेट कमिटी मेंबर ) नितीन सैद , महाराष्ट्र स्टेट कमिटी मेंबर सौ . चित्रा उर्फ श्रावणी कामत, क्राईम बॉर्डर चे पदाधिकारी मिथुन पाटील , नवी मुंबई संपर्क प्रमुख नवनाथ चवरे ,क्राईम बॉर्डर चे प्रतिनिधी संतोष कोलंबकर,जिगर शाह ,छायाचित्रकार हर्षद राजगुरू ,समाजसेवक बाळकृष्ण राणे ,भारत मुक्ती मोर्चाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भारत घुले उपस्थित होते.

अंबरनाथ ते कर्जत परिसरातील वीटभट्टीवर काम करणारे स्रिया , पुरुष व मुले मुली यांच्यासाठी अश्या प्रकारचे विशेष कार्यक्रम जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ), तसेच क्राईम बॉर्डर चे संस्थापक राजेंद्र वखरे यांनी सांगितले .