CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली वाहतूक शाखेतील लेडी सिंघम सपोनिरी.राजेश्री शिंदे

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर) : डोंबिवली वाहतूक विभागाचे व.पो.निरी.सतीश जाधव यांची बदली झाल्याने सपोनिरी.राजेश्री यांचे शिंदे यांनी प्रभारी पदभार स्वीकारला आहे.राजेश्री शिंदे यांनी डोंबिवली विभागात यापूर्वी काम केलेले आहे त्यांची काम करण्याची पद्धत कडक व शिस्तीची असल्याने सुरुवातीपासूनच त्यांचा दरारा वाहनचालकांमध्ये आहे. त्या कर्तव्यात कसूर करीत नसून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा त्या उचलत होत्या.आता त्यांनी प्रभारी पदभार स्वीकारल्याने डोंबिवलीतील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

मद्यप्राशन करून वाहन चालविणारे तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर शिस्तीचा बडगा त्यांनी उचललेला आहे. ३० डिसेंबर २०२० च्या रात्रीपासून ०१ जानेवारी २०२१ पहाटे चार वाजेपर्यंत डोंबिवली मधील ३६ वाहनचालकांना मद्यप्राशन करून वाहन चालविताना दुचाकी ,चारचाकी वाहन चालक आणि त्यांना वाहन चालविण्यास प्रवृत्त करणाऱ्या अशा २१ जणांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे सदर कार्य करता येत असल्याचे त्या म्हणतात .

यामध्ये डोंबिवली विभागातील रामनगर, शिवाजी नगर उद्योग चौकी, शेलार नाका ,बावन चाळ, महात्मा फुले चौक ,रेल्वे स्टेशन ,घर्डा सर्कल ,सम्राट चौक व इतर परिसरात सदर कारवाई करण्यात आली आहे .डोंबिवली वाहतूक उपविभाग प्रभारी राजेश्री शिंदे यांनी ४ अधिकारी ,१० पोलीस हवालदार ७ पोलीस नाईक , ६ पोलीस कॉन्स्टेबल आणि ९ वार्डन यांनी सदर कारवाई केली.सपोनिरी.राजेश्री शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यावर जातीने लक्ष घालून डोंबिवली पूर्व, पश्चिम येथील रहदारी योग्य प्रकारे व्हावी. वाहनचालकांना शिस्त लागावी यात रिक्षाचालक ,दुचाकीस्वार आणि अल्पवयीन दुचाकी चालविणारे यांच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसत आहे.