CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाणे आयुक्तालयातील ३५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (कार्यालय प्रतिनिधी) : ठाणे पोलीस आयुक्तालयामधील एकूण ३५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश गुरुवारी सहपोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी काढले आहेत.यावेळी आठ पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची संधी मिळाली असून यावेळी खंडणी विरोधी पथक व गुन्हे अन्वेषण विभागातही मोठे बदल करण्यात आहे.या बदल्यांमध्ये मात्र एकूण पाच अधिकाऱ्यांना एस. बी. सारख्या साईड ब्रांचला जावे लागले आहे.

डोंबिवलीला दोन नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक: डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस स्टेशनला कोनगाव पोलीस ठाण्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेतला आहे. त्याच बरोबर डोंबिवली पूर्वेतील रामनगर पोलीस ठाण्यात शांतीनगर येथून बदलून आलेले सचिन सांडभोर यांची बदली झाली आहे.

कल्याण नियंत्रण कक्षातील विलास पाटील यांची भिवंडी गुन्हे शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे. विशेष शाखेच्या सुलभा पाटील यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी डायघर पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.तर कोनगाव पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी मानवी संसाधन विभागाचे गणपत पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर निजामपुरा पोलीस ठाण्याचे शंकर इंदुलकर यांची भोईवाडा येथे तर कोपरी चे दत्ता गावडे यांची बदलापूर पश्चिमला बदली झाली आहे.कळवा येथून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात यांची बदली करण्यात आली आहे.

ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचे विकास घोडके यांची गुन्हे शाखा वागळे इस्टेट ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बदली झाली आहे . खंडणीविरोधी पथकाचे तील संजय शिंदे यांची अमली पदार्थ विरोधी पथकात तर मध्यवर्ती शोध पथकाचे अशोक होनमाने यांची भिवंडी च्या गुन्हे शाखेमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.वाहतूक शाखेतील दत्तात्रय ढोले यांना वागळे इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी तर डायघर चे चंद्रकांत जाधव यांना विशेष शाखेमध्ये नेमण्यात आले आहे. मुंब्रा पोलीस ठाणे येथून अरुण क्षीरसागर यांना सुद्धा वागळे इस्टेट गुन्हे शाखेमध्ये संधी मिळालेली आहे.

खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांची मानवी संसाधन विभागांमध्ये तर कल्याण गुन्हे शाखेचे संजीव जॉन यांची खंडणीविरोधी पथकात तर भिवंडी गुन्हे शाखेचे शितल राऊत यांची भिवंडी मधील शांतीनगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून तर ममता डिसोजा यांना कोपरी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बदली झाली आहे.बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनचे व.पो.नि. लक्ष्मण सारीपुत्र यांची विशेष शाखेत तत् पोनि . वनिता पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखेतून चितळसर पो. स्ट. तर विकास घोडके गुन्हे शाखा ठाणे येथून गुन्हे शाखा युनिट ५ ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी तर गुन्हे शाखा ठाणे शहर येथून अमली पदार्थ विरोधी पथक ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी १. गणपत दिनकर पिंगळे २. शंकर आंनदराव इंदलकर ३.दत्ता सावळाराम गावडे ४. संजय साहेबराव साबळे ५.. सचिन सुधाकर सांडभोर ६.कन्हैयालाल पन्नालाल थोरात ७. विकास शिवाजी घोडके ८.अशोक बाबू होनमाने .