CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

स्वातंत्र्य सैनिक दामोदर उसगावकर यांचा सन्मान

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

स्वातंत्र्य सैनिक दामोदर उसगावकर यांचा सन्मान

ठाणे दि.९ : राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथील सत्कार समारंभासाठी निवड करण्यात आलेले स्वातंत्र्य सैनिक श्री.दामोदर सोहिरोबा उसगावकर यांचा सन्मान महाराष्ट्र शासनाचे वतीने जिल्हाधिकारी ठाणे यांचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय दंडाधिकारी,ठाणे अविनाश शिंदे यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून मुलीचा शाल व श्रीफळ देऊन गौरव केला.

दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त महामहीम राष्ट्रपती यांचेकडून सन्माननीय स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित केला जातो. यासाठी महाराष्ट्रातून १० स्वातंत्र्य सैनिकांची निवड केली होती. परंतु कोविड-१९ प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेवून ९ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिकांना राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे बोलवित येणार नाही, असे केंद्र शासनाने कळविले होते.

उपरोक्त परिस्थितीच्या अनुषंगाने, सत्कार समारंभासाठी निवड करण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, स्वातंत्र्य सैनिकांचे घरी जाऊन त्यांना शाल वस्त्र देऊन करावा, असे केंद्रीय गृह मंत्रालयाचे निर्देश होते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील श्री उसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांच्यामुलीने हा सत्कार स्विकारला.