CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कोविड कचरा उघड्यावर : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

कोविड कचरा उघड्यावर : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

डोंबिवली दि.३ जुलै(बापू वैद्य) : कोरोनाचा सध्या कहर सुरु असताना,अनेक ठिकाणी कोविड रूग्णालयांंबाहेर फेकल्या जात असलेल्या जैविक कच-यामुळे रूग्ण वाढण्याची भिती निर्माण होत आहे. पालिकांकडून आपपल्या हद्दीत तील रूग्णालयावर कारवाई केली जाते., मात्र फारशी सुधारणा होताना दिसत नाही. याबाबत खरी स्थिती पाहिली असता कल्याण डोंबिवली परिसरात स्थिती गंभीर आहे.

कोविड रूग्णालये कोविड कच-याबाबत निष्काळजी असून जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी कडोंमपाचा उंबर्डे येथे प्रकल्प आसताना कुठेही हा कचरा फेकून दिलेला असतो.कडोंमपा परिसरातील कोविड रूग्णालयांंकडून जरी दंड वसूल केला जातो .पण दंडाची रक्कम अत्यंत अल्प असल्याने रूग्णालय कोविड कच-याबाबत फारसे गंभीर नसल्याचे मत लोकप्रतिनिधी म्हणतात.

कोविडच्या कच-याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली गेली पाहिजे मात्र महापालिका हद्दीतील काही नाँनकोविड रूग्णालयांंकडून कोविड कचरा वेगळा न करता तो इतर कच-यात मिसळून फेखला जातो.महापालिका तर्फे आरोग्य व घनकचरा विभागाने कचरा उघड्यावर टाकला म्हणून दंड वसूल करण्यात येतो तरी राजरोसपणे पणे अनेक ठिकाणी कोविडचा कचरा फेकलेला दिसत असतो.

कोविड कच-याची कशी विल्हेवाट शास्त्रोपण रि-या कशी लावायची याबाबत केंद्र व राज्य सरकारचे निर्देश असून त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही हे खरे.