CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नवी मुंबई तळोजा एमआयडीसी वाहतूक पोलीस वाहनधारकांकडून घेताहेत पैसे

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

नवी मुंबई तळोजा एमआयडीसी वाहतूक पोलीस वाहनधारकांकडून घेताहेत पैसे

डोंबिवली .दि.३ जुलै (कार्यालय प्रतिनिधी) :पनवेल कडून शीळ फाट्याकडे येतांना तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक शाखेचे पोलीस हे विनाकारण वाहन धारकांकडून पैसे वसूल करीत आहेत .दिनांक ३ जुलै रोजी दुपारी तीन वाजता क्राईम बॉर्डर चे पत्रकार पनवेलवरून डोंबिवलीच्या दिशेकडे येत असतांना त्यांना पाटील नावाच्या पोलीस हवालदारानीं थांबविले कारण सांगितले की तू मोबाईल वर बोलत होता‌. तुझे सर्व कागदपत्र दाखव कोरोना काळामध्ये कोणाचे कागदपत्र तपासू नये असा आदेश असताना सुद्धा त्यांनी सर्व ओरिजनल कागदपत्रांची मागणी केली. सदर पत्रकाराकडे त्यांच्या डॉक्युमेंट च्या सर्व पीडीएफ मोबाईल मध्ये होत्या परंतु हवालदार ऐकायला तयार नव्हते. तुला बाराशे रुपयांचा दंड भरावा लागेल. तसेच तुझे तीन महिन्यासाठी लायसन्स रद्द करतो असे त्यांनी सांगितले.

 

आरटीओचे कामकाज बंद असून कोणतेही शासकीय कार्यालयात कामे होत नाही हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असून सुद्धा त्यांनी बाराशे रुपयांची पावती फाडण्याचा आग्रह धरला. अन्यथा तुझी गाडी पोलीस स्टेशनला जमा कर व कोर्टातून सोडून घे तेव्हा पत्रकार म्हणाला की मी साहेब गाडी तुमच्याकडे ठेवून डोंबिवलीला कसा जाऊ तेव्हा त्यांनी सल्ला दिला कि गाडी जमा कर आणि एसटीने डोंबिवलीला जा डोंबिवली फार लांब नसल्याचा सल्लाही त्यांनी दिला .

 

तेव्हा त्या पत्रकाराने क्राईम बॉर्डर चे संपादक राजेंद्र वखरे यांना फोन करून सदर प्रकार सांगितला असता संपादक राजेंद्र वखरे यांनी त्या पोलीस हवालदार यांच्याशी मोबाईल वरून बोलणे करून काय प्रकार आहे ते समजून घेतले व कायद्याच्या चौकटीत मदत करण्यास सांगितले त्या हवालदारानीं बळजबरी त्या पत्रकारांकडून चारशे रुपये घेऊन त्यांचे वाहन सोडून दिले.त्याठिकाणी यांच्याप्रमाणेच इतर सहा-सात गाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. ते सदर पत्रकाराला म्हणाले की तू इथून लवकर जा तुला आम्ही सोडून देतोय बाकीच्या कडून आम्हाला काय करायचे ते पाहायचं आहे.

 

अशाप्रकारे कोरोनाच्या काळामध्ये हाताला काम नाही ,पोटापाण्याचा प्रश्‍न असून लोकं ही कामधंद्यासाठी बाहेर पडलेली आहेत पोलिसांनी कोरोना काळातील केलेले चांगले कार्य स्मरणात आहे.पोलीस देव रुपाने मदत करीत असताना नवी मुंबईतील ट्राफिक पोलीस हे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांकडून कोणतेही कारण सांगून कायद्याची भीती दाखवत पैशाची वसुली करीत असल्याचे समोर आले आहे.

 

लवकरच यासंदर्भात क्राईम बॉर्डर चे संपादक तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वखरे पोलीस कमिशनर नवी मुंबई यांना कारवाई संदर्भात पत्र पाठवणार आहेत.