CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

खाजगी रुग्णालयाने कोविड रुग्णाकडून घेतलेल्या अतिरीक्त बिलाचे पैसे पालिकेच्या भरारी पथकाने रुग्णाला परत मिळवून दिले !

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

खाजगी रुग्णालयाने कोविड रुग्णाकडून घेतलेल्या अतिरीक्त बिलाचे पैसे पालिकेच्या भरारी पथकाने रुग्णाला परत मिळवून दिले !

डोंबिवली : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांच्या उपचाराकरीता महापालिका विविध उपाययोजना करीत आहे. या उपाययोजने अंतर्गत महापालिका क्षेत्रातील २४ खाजगी रुग्‍णालये रुग्‍णांचा उपचाराकरीता उपलब्ध झाली आहेत. शासनाने कोविड रुग्णांच्या उपचाराकरीता दर सुची निश्चित केली असून‍ त्या दरसूचीमध्ये कमाल दराच्या मर्यादेचे पालन होत असल्याबाबत खातरजमा करणेबाबत व प्रत्येक रुग्णांना बेड उपलब्ध होईल याची खात्री करण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करणेबाबत निर्देश दिले आहेत, असे असतांनाही अवाजवी बिल आकारल्याबाबत व बेड उपलब्ध होत नसल्याबाबतच्या तक्रारी काही रुग्णांकडून प्राप्त होत आहेत.

याकरीता खाजगी कोविड रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांस वाजवी दरामध्ये उपचार उपलब्ध व्हावेत तसेच त्यांना विनासायास बेड उपलब्ध व्हावेत याकरीता महापालिकेने आता या सर्व २४ रुग्णालयात महापालिका कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. सदर कर्मचारी त्‍यांना नेमून दिलेल्या रुग्णालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून रुग्णाला डिसचार्ज करतेवेळी रुग्णालयाकडून आकारण्यात येणा-या बिलाची पडताळणी करतील व रुग्णांस वाजवी बील दिल्याबाबत खातरजमा करुन बीला संदर्भात काही अडचणी उदभवल्यास महापालिकेने गठित केलेल्या समितीच्या निदर्शनास आणून देतील, सदर समिती त्यावर तात्काळ निर्णय घेवून प्रकरणाचा निपटारा करेल.

यापूर्वीच खाजगी रूग्णालयांनी , शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच बिले आकारावीत, असे महापालिकेने सर्व रूग्णालयांना कळवून देखील कोव्हिडवर उपचार करणा-या तीन रूग्णालयांबाबत तक्रारी प्राप्त होताच सदर रूग्णालयांना महापालिकेकडून कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली असतांनाही एका कोव्हिड रूग्णालयाने तेथे दाखल केलेल्या एका रूग्णाकडून रु. 4,81,000/- इतक्या रक्कमेचे बीलाची आकारणी केली असता महापालिकेच्या भरारी पथकाने सदर बाबींची शहानिशा करून सदर रक्कमेपैकी रु.3,36,900/- इतकी रक्कम सदर रूग्णालयाकडून वसूल करून रूग्णास परत केली‍ आहे.