CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

राँयल काँलेज रोटरँक्ट पदग्रहण सोहळा संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

राँयल काँलेज रोटरँक्ट पदग्रहण सोहळा संपन्न

डोंबिवली :बापू वैद्य:-रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन यांच्याशी संलग्न असलेल्या रोटरॅक्ट क्लब ऑफ यूथ रॉयल कॉलेज, डोंबिवली, यांचा पद्ग्रहण सोहळा ऑनलाईन पद्धतीने, आज दिनांक 18 जुलै रोजी साजरा करण्यात आला.मावळते अध्यक्ष रो. राज दोशी यांनी पुढील वर्षाचे अध्यक्ष रो. आशुतोष आर्य यांच्याकडे सूत्रे सोपवली. तसेच मागील वर्षाची सेक्रेटरी रो. भारती जैन हिने पुढील वर्षाचे सेक्रेटरी रो. अनुपम प्रसाद यांच्याकडे सूत्रे सोपवली.


या प्रसंगी रॉयल कॉलेजचे प्राचार्य डॉ. विवेककुमार पाटील, प्रो. रुपेश ध्रुवांशी, सौ. चंदा डोंगरे, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे माजी अध्यक्ष डॉ मनोहर अकोले, सेक्रेटरी अजय कुलकर्णी, रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 चे अमित लाड, शिवम यादव, देवाशीष मांडे, हे उपस्थित होते. याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष रो. आशुतोष आर्य यांनी आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरचा परिचय करून दिला.


याप्रसंगी अध्यक्ष ऍडव्होकेट कैलास सोनवणे, प्राचार्य पाटील यांनी त्यांच्या भाषणात रोट्रॅक्टर्सना या करोना साथीमध्ये विविध समाजोपयोगी कामे कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी रोटरी क्लबचे मान्यवर सभासद, कॉलेजचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थ्यांचे पालक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.