CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

दुकाने व व्यवहार सुरु ठेवण्यास मुभा:कामगारांनी व्यक्त केला आनंद

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

दुकाने व व्यवहार सुरु ठेवण्यास मुभा:कामगारांनी व्यक्त केला आनंद

डोंबिवली :(बापू वैद्य):करोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी विरोधात नागरिक व्यापारी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे स्थानिक प्रशासनने सोमवार पासून निर्बंध शिथिल केले. केवळ अतिसंक्रमित क्षेत्रापुरते कडक निर्बंध कायम ठेवून अन्यत्र दुकाने व व्यवहार सुरु ठेवण्यास मुभा दिली. दुकाने सुरु झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला. डोंबिवलीतील सम विषम तारखेप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्र नसलेल्या क्षेत्रात फक्त एकाबाजूची अनेक दुकाने सकाळी ९ वाजल्यापासून सुरु झाली तर सायंकाळी ५ वाजता बंद करण्यात आली. अनेक दिवसांपासून दुकाने बंद असल्याने सकाळचा बराचसा दुकानदारांचा वेळ झाडलोट करण्यात गेला. सोमवार पहिलाच दिवस असल्याने दुकानांत फारशी गर्दी दिसत नव्हती

 

डोंबिवलीतील पूर्व पश्मिमेला प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रात दिवसभर किराणा मालासह इतर छोटी मोठी दुकाने सूरु झाली.कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे राहत असलेल्या जूनी डोंबिवली हा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला असला तरी त्या शेजारील आरबीआय कालनीत दुकाने रिक्षा सुरु होत्या. जूनी डोंबिवलीतील प्रतिबंध क्षेत्र हा महापौरांच्या क्वरांटाईन मुळे प्रसिद्ध झाला होता मात्र बिनदिक्कत नागरिकांची ये जा सुरु होती. सकाळपासून पोलिसांनी गस्त सुध्दा घातली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. महात्मा फुले , सुभाष रोड, गुप्ते रोडवरील सम विषम तारखेप्रमाणे दुकाने सूरु होती.

 

द्वारका हाँटेल परिसरात बँका वीज कार्यालय,एटीएम सेंटर,रिक्षा स्टँड असल्याने काल सकाळपासून नागरिकांचा वावर होता. डोंबिवली पश्चिम हा दाट वस्तीचा भाग आहे.येथे अनेक छोटे मोठे व्यवसाय करणारे हातावर पोट भरणारे आहेत. त्यांनी दुकाने सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. येथील प्रतिबंधित क्षेत्र सोडल्यास दुकाने दुपारनंतर सूरु केली.डोंबिवली पूर्व कडील भागात मोबाईल,फर्निचर,कपडे,कटलरी,बँगा इत्यादी दुकाने सुरु झाली.

 

इंदिरा चौकातील साड्यांचे मोर्विका,राजघराणा,इत्यादी दुकाने सुरू झाली असली तरी ग्राहकांची लगबग दिसत नव्हती.दुकाने उघडल्या मुळे फेरीवाले सुध्दा येउन बसायला सुरुवात झाली.छत्र्या,मोबाईल अस्केसरी, नारळपाणी,घरगुती सामान दुरुस्ती,वडापाव, चपला, इत्यादी फेरिवाले आले.टिळक नगर भाग प्रतिबंधित क्षेत्र असल्याने मानपाडा रस्त्यावर फडके वाँच येथे चार रस्त्यावर

 

बांबू आडवे टाकल्याने नागरिकांना वळसा घालून जावे लागत असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात नाराजी प्रकट केली.शेलार नाका, इंदिरा नगर,त्रिमूर्ती नगर येथील काही नागरिक दुकानंशी संबधीत कामे करित असल्याने दुकाने सुरु झाली असल्याने पोटापाण्यासाठी सोय झाल्याचे सांगितले.