CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

रोटरी इंटरँक्ट चा पदग्रहण सोहळा संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

रोटरी इंटरँक्ट चा पदग्रहण सोहळा संपन्न

डोंबिवली :- रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन यांच्याशी संलग्न असलेल्या इंटरॅक्ट क्लब ऑफ महात्मा गांधी विद्यामंदीर, डोंबिवली पश्चिम, यांचा पदग्रहण सोहळा ऑनलाईन पद्धतीने आज दिनांक १७ जुलै रोजी साजरा करण्यात आला.मावळती अध्यक्षा कु. मीनाक्षी ठोंबरे हिने पुढील वर्षाची अध्यक्षा कु. प्राची बागवे हिच्याकडे सूत्रे सोपवली. तसेच मागील वर्षाची सेक्रेटरी कु. नेहा बागवे हिने पुढील वर्षाची सेक्रेटरी कु. कशीश भोईर हिच्याकडे सूत्रे सोपवली. तसेच कु. तन्वी गांधी, कु. साक्षी भोईर यांनी डायरेक्टर म्हणून सूत्रे स्वीकारली. कु. मंजिरी साळुंके हिने कोषाध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली. कु. योगिनी वडनेरे आणि कु. दीक्षा खंदारे यांनी निवेदन केले व कु. प्रियांका म्हात्रे हिने स्वागतगीत व इशस्तवन गायले.

 

या कार्यक्रमाची धुरा महात्मा गांधी विद्यामंदिरच्या शिक्षिका व समन्वयक प्रिया जोशी यांनी इतर कर्मचारी वृंदाच्या सहाय्याने समर्थपणे वाहिली.रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे नियोजित गव्हर्नर कैलाश जेठानी, शाळेचे मुख्याध्यापक आहेर सर, रेल चाईल्ड संस्थेचे उल्हास झोपे, समन्वयक प्रिया जोशी, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे माजी अध्यक्ष डॉ मनोहर अकोले, अध्यक्ष ऍडव्होकेट कैलाश सोनवणे, माजी मुख्याध्यापिका प्राची पेणकर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ च्या रेशम ठाणेकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे सेक्रेटरी अजय कुलकर्णी व कु. सुरभी सोनवणे यांनी या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळली. या प्रसंगी रोटरी क्लबचे मान्यवर सभासद, शाळेचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थ्यांचे पालक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता मुख्याध्यापक आहेर सरांनी पसायदान गाऊन केली.