CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा सागर लोणे तर उपाध्यक्ष पदी सुभाष गोटीराम पवार यांची बिनविरोध निवड

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा सागर लोणे तर उपाध्यक्ष पदी सुभाष गोटीराम पवार यांची बिनविरोध निवड

डोंबिवली: ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा सागर लोणे तर उपाध्यक्ष पदी सुभाष गोटीराम पवार यांची बिनविरोध निवड झाली.एन.के.टी कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन)तथा सभा सचिव छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या.

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणूकीनंतर सध्या कार्यरत असणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा पदावधी १५ जुलै रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज प्राप्त झाल्याने दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी घोषित केले. ही प्रक्रिया पार पाडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

नवनिर्वाचित अध्यक्ष सुषमा लोणे या कल्याण तालुक्यातील खडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडुन आल्या आहेत तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत.