CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

क्वारंटाईन सेंटरमध्ये युवतीवर अत्याचार-जनतेत संताप-पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

क्वारंटाईन सेंटरमध्ये युवतीवर अत्याचार-जनतेत संताप-पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पनवेल (क्राईम बॉर्डर रिपोर्टर ):पनवेल तालुक्यातील कोन येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या कोरोना संशयित एका २५ वर्षीय युवतीवर क्वारंटाईन असलेल्या एका २५ वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे.इंडिया बुल्स या गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी १००० खोल्याचे कोरंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे.येथे पनवेल,उरण व नवी मुंबईतील संशयित रुग्णांना ठेवण्यात येते.याठिकाणी जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत परंतु त्यांची तब्येत चांगली आहे अशांवर याठिकाणी उपचार करण्यात येतात.

 

गुरूवारच्या रात्री येथील सेंटरमध्ये एक घ्रॄणास्पद प्रकार उघडकीस आलेला आहे.पनवेल तालुक्यामधील कोरोना बाधित संशयित असलेल्या एका युवतीला इंडिया बुल्स या ठिकाणी दाखल करण्यात आले होते.या महिलेवर वय वर्ष २५ असलेल्या युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.यासंदर्भात पनवेल पोलीस ठाण्यात सदर युवकाविरुद्ध पीडित युवतीने तक्रार दाखल केली असून या दोघांचेही कोरना चाचणीचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

 

सर्व जग हे कोरना वैश्विक महामारीशी लढत असताना अशा घाणेरड्या लैंगिक अत्याचाराची घटना घडणे ही शरमेची व दुर्दैवी घटना असल्याच्या विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पुरुषांना व महिलांना स्वतंत्र क्वॉरंटाईन करणे आवश्यक असताना सुद्धा या ठिकाणी हा युवक पोहोचलाच कसा त्याचबरोबर या ठिकाणी सुरक्षा रक्षक नव्हते का ? आदि भोंगळ कारभाराबाबत उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. सदर दुर्देवी घडलेल्या घटनेची चौकशी करण्याची मागणी महिला दक्षता समितीच्या सदस्य असलेल्या नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांनी केलेली आहे.

 

पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयित अथवा हाय रिस्क रुग्णांसाठी क्वारंटाईनची व्यवस्था कोन येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे.या इमारतीतच हा खळबळजनक प्रकार उघड आला आहे. हा प्रकार गुरूवारी मध्यरात्री क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संशयीत म्हणून दाखल तरुणीबाबत घडला.या तरुणीचा विकृत तरुणाने विचित्र पद्धतीने विनयभंग केला आहे. पनवेल तालुका पोलीसांनी याप्रकरणी भा.दं.वि.कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पनवेल तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत