CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ॲडमिशनच्या नावने परेल मधील सर जे.जे. हायस्कूलच्या शाळेने सिनियर केजी च्या पालकांकडून उकळले अठरा हजार रुपये

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

ॲडमिशनच्या नावने परेल मधील सर जे.जे. हायस्कूलच्या शाळेने सिनियर केजी च्या पालकांकडून उकळले अठरा हजार रुपये

डोंबिवली : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 2020-21 च्या शैक्षणिक वर्षाचे कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्याचा आदेश आधीच सर्व शाळांना दिला असतानाही परेल येथील सर जे.जे.हाय स्कुल या शाळेने सिनिअर केजी च्या मुलाच्या पालकांकडून अठरा हजारांचे शुल्क आकारले.याबाबत चिरंजीवी संघटनेकडे तक्रार अली असल्याचे राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी सांगितले.

गरीब घर असल्याने कुठून कुठून पैसे जमा करून आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी त्या पालकांनी शाळेला घाबरून पैसे भरलेही परंतु ती शाळा अजूनही अशा अनेक विद्यार्थ्यांकडून भारी रकमेचे शुल्क आकारत असल्याचे संघटनेचे राज्यसंघटक वैष्णवी ताम्हणकर यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा ताई गायकवाड तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा शाळांवर सक्त कार्यवाही करावी आणि शाळेने घेतलेली फिज पालकांना परत करावी.तत्याचबरोबर याबाबत लोकांशी थेट संवाद साधून वर्षा गायकवाड यांनी पालकांना या दाबावातून बाहेर काढावे.असे संघटनेचे राज्यकार्यवाह राहुल भट म्हणाले.

कोणतीही शाळा अशा प्रकारे तुम्हाला सतावत असेल किंवा दबाव टाकत असेल तर आम्हाला 9356420269 या नंबर वर कळवावे.आम्ही आपली समस्या नक्की सोडवू असे आवाहन संघटनेच्या राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी केले.