CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली वार्तापत्र : बापू वैद्य
रोटरेक्ट क्लब व चिदानंद रक्त पेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न : डोबिवलीतील झोन ६ मधील सर्व रोटरी क्लब,रोटरेक्ट क्लब व चिदानंद रक्त पेढी यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै रोजी शुभमंगल हॉल,डोंबिवली पूर्व येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ़ डोंबिवली मिडटाउनचे अध्यक्ष एडव्होकेट कैलाश सोनवणे, सचिव अजय कुलकर्णी, नियोजित अध्यक्ष जितेंद्र नेमाडे, माजी अध्यक्ष अभय कुवळेकर व डॉ मनोहर अकोले हे उपस्थित होते.तसेच अजय कुलकर्णी व जितेंद्र नेमाड़े यांनी स्वतः रक्तदान करुन या महान कार्यास हातभार लावला. अनेक रोटरेक्ट व रोटरी क्लब सभासदांनी सुद्धा रक्तदान केले
याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे सचिव डॉ माधव बैतुले, श्री श्रीपाद कुलकर्णी व श्री मिलिंद कुलकर्णी यांनी या रक्तदान शिबीरास भेट देऊन या करोना साथीच्या काळात असा उपक्रम राबविल्या बद्द्ल रोटरेक्ट क्लब, रोटरी क्लब झोन ६ व चिदानंद रक्त पेढी यांचे कौतुक केले.सामाजिक अंतराचे विशेष भान राखून, मुखपट्टी व सॅनिटायझरचा सुयोग्य वापर करुन हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते हे उल्लेखनीय.
रोटरी क्लब आँफ डोंबिवली मिडटाऊन ची इंस्टॉलन मिटींग होऊन ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य व पत्रकार जान्हवी मौर्य यांची २०२०-२०२१ करता आँनररी सदस्य म्हणून रोटरी मिडटाऊन चे नवनिर्वाचित आध्यक्ष रो.अँडव्हेकट कैलास सोनावणे यांनी केल्याचे जाहीर केले.पत्रकार बापू वैद्य हे सलग पाच वर्षे,तर जान्हवी मौर्य पत्रकार ह्या सलग तीन वर्षे मिडटाऊन चे आँनररी सदस्य म्हणून कार्यरत आहेत।
डोंबिवली : पंधरा जून पासून महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची ऑनलाईन शाळा घेण्याचा जो काही निर्णय घेतला आहे त्याला चिरंजीवी संघटनेने विरोध करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली ई-मेल च्या माध्यमातून शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे हा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा अन्यथा चिरंजीवी संघटना " घरोघरी घंटानाद "आंदोलन करणार असल्याची घोषणा संघटनेच्या राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी दिली. ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय हा सर्वसमावेशक नाही आहे त्यामध्ये बरीच मूळ या शिक्षणातुन मुकली गेली आहे हा निर्णय रद्द करून सर्वसमावेशक निर्णय घेण्यात यावा असे अध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी सांगितले
या कोरोनाच्या भयंकर काळात जिथे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने वाढत आहे,अनेक घरांमध्ये एक वेळच्या जेवणासाठी देखील धान्य नाही,अनेक गावांमध्ये वीज नाही,पाणी नाही अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप अशी उपकरणे कुठून येणार हा साधा विचार सरकार ने केला नाही का ? असा प्रश्न संघटनेचे राज्यकार्यवाह राहुल भाट यांनी विचारला.
अनेक विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये देखील कोरोना चे रुग्ण आहेत,अनेकांना कॉरंटाईन केलेलं आहे आधीच लहान मूल या वातावरणात घाबरले असताना ते ऑनलाईन सत्र अटेंड करु शकणार नाहीत आणि शाळेतून ऑनलाईन शाळा अटेंड करण्याच्या दबावामुळे मुलांचे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता असल्याचे संघटनेच्या राज्यसंघटक वैष्णवी ताम्हणकर यांनी सांगितले.
ऑनलाईन सत्र अटेंड करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारलं असता शिक्षक शिकवतात हे आम्हाला कळत नाही,खूप विद्यार्थी असल्याने प्रश्न विचारता येत नाहीत असे उत्तर दिले असल्याचे संघटनेचे राज्यसचिव चेतन कांबळे यांनी सांगितले.
जव्हार मोखाडा येथील शाळेने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शाळा अटेंड करत अनिवार्य असल्याचे सांगितले आहे.या काळात जे घर फक्त आणि फक्त लोकांच्या येणाऱ्या धान्याच्या मदतीने जगत आहे अश्या घरातील हा मुलगा अतिशय हुशार आहे.आपण नापास होऊ नये या भीतीने तो घरच्यांकडे मोबाईल चा हट्ट करत आहे.ही केवळ एकच घटना आहे अशा अनेक घटना गावागावांमध्ये घडत असाव्यात ही माहिती संघटनेचे राज्यप्रवक्ता राहुल बनसोडे यंनज दिली.
डोंबिवलीच्या जागरूक नागरिकाच्या तक्रारीची थेट दखल मंत्र्यांनी घेतली...बेस्ट बंद करण्याच्या निर्णयाची जागरूक नागरिकाने केली तक्रार...पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिले मुंबई महापालिकेला लक्ष घालण्याचे आदेश.....
डोंबिवली : देशात लॉकडाऊन घोषित झाल्या पासून मुंबई सह उपनगरांमध्ये बेस्टने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कोरोनायोध्यांची सेवा केली. मात्र बेस्टच्या सेवा आता काही स्थानकांवर थांबणार नसल्याने कोरोना योध्यांची मोठी गैरसोय होणार होती.त्यामुळे याची माहिती डोंबिवलीच्या मंदार अभ्यंकर या जागरूक नगरिकाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सह पर्यावरण मंत्र्यांकडे केली होती. अखेर त्यांच्या तक्रारीची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली असून बेस्ट प्रशासनाला आणि मुंबई महापालिकेला या प्रकरणात लक्ष देण्याची सूचना ठाकरेंनी दिली आहे.
महाराष्ट्रात संचार बंदी असल्याने रस्त्यावर फक्त पोलीस, रुग्णवाहिका आणि बेस्ट यांचीच वर्दळ सर्वाधिक असायची. मुंबईत काम करणारे पोलीस,डॉक्टर,नर्सेस, रुग्णालयातील कर्मचारी आणि शासकीय कर्मचारी यांची सेवा करण्यासाठी मुंबई पासून बदलापूर पर्यंत बेस्ट रस्त्यावर धावत होती.मात्र आता अचानक बेस्ट ने निर्णय घेऊन ती बंद केली.यांच्या करिता लोकल सेवा सूर झाली मात्र उपलब्ध असलेल्या माहिती नुसार लोकल ट्रेन सुरू झाल्या मुळे बेस्ट बस सर्विस जी गेले काही महिन्यांपासुन सुरु होती ती discontinue करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सुरू झालेल्या लोकल ट्रेन ह्या फक्त फास्ट ट्रैक वर चालवण्यात येत आहेत त्या मुळे essential services staff जे इतर स्टेशन परिसरात राहतात त्यांच्या साठी रोजच्या प्रवासाचे प्रचंड आव्हान निर्माण झाले आहे.तरी ह्या कडे लक्ष द्यावे अशी मागणी डोंबिवलीच्या मंदार अभ्यंकर या जागरूक नगरिकाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सह पर्यावरण मंत्र्यांकडे केली होती. अखेर त्यांच्या तक्रारीची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली असून बेस्ट प्रशासनाला आणि मुंबई महापालिकेला या प्रकरणात लक्ष देण्याची सूचना ठाकरेंनी दिली आहे.www.socialmedianews.org.in
कडोंमपाच्या क्षेत्रात कोरोना प्रभाव :राजकारण तापले.-केडीएमसी क्षेत्रात कोरोना वाढला,राजकारण झालं आक्रमक...
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. रोज तीन अंकी आकडा समोर येत असून महापालिकेकडे रुग्णांसाठी सोयी सुविधा नसल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे.तर काही रुग्णाना वेळेत उपचार न मिळाल्याने आपला प्राण सुद्धा गमवावा लागला. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासन आणि सेना-भाजप पक्षावर टीका केली जात आहे.शिवसेना-भाजप गेले अनेक वर्षे सत्ता असून सुद्धा सुसज्ज हॉस्पिटल उभारले गेले नाही. सेना-भाजपच्या अपयशाची शिक्षा लोकांना का असे प्रश्न नागरिक आता विचारू लागले आहेत.मागच्या 5 वर्षात केंद्रापासून महानगरपालिका पर्यँत सत्ता सेना-भाजपाकडे होती.तसेच कल्याण-डोंबिवली भागात 2 खासदार, 3 आमदार, मंत्रीपद , महापालिकेची सर्व पद असून सुद्धा वैद्यकीय सेवेवर लक्षच दिले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.
महापालिकेकडे रुग्णांसाठी सोयी सुविधा नसल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. याबाबतच्या बातम्या सुद्धा प्रसारित झाल्या. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरीत धाव घेत कल्याण आयुक्तां आणि लोकप्रतिनिधी सोबत बैठक घेतली.तर काल विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी बैठक घेत आढावा घेतला आणि प्रशासन जाब विचारत शिवसेना टार्गेट सुद्धा केले आहे.राज्यात शिवसेनेची सत्ता, ठाण्यात शिवसेनेचे मंत्री, कल्याणात शिवसेनेचा खासदार, आमदार, महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता एवढे सगळे असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि समन्वयाआभावी आज कल्याण डोंबिवलीत कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र येत्या 8 दिवसांत कल्याण डोंबिवलीतील परिस्थिती सुधारली नाही तर भाजप आक्रमक भूमिका घेणार असे पत्रकार परिषदेत देरेकर यांनी सांगितले.तर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आपल्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम द्वारे यासर्व परिस्थितीला सेना-भाजप या दोन्ही पक्षाला जीमेदार ठरवत पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे.
मनसे आमदार यांनी केलेली फेसबुक पोस्ट :- केडीएमसी मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून युतीचीच सत्ता आहे.जवळजवळ २० हजार कोटीच्यावर बजेट या काळात मंजुर झाले. परंतु आरोग्य सेवेच्या नावाने बोंबाबोंबच आहे. मागच्या सरकारमध्ये डोंबिवलीचे आमदार वैद्यकिय शिक्षण मंत्री, पालकमंत्री हेच आरोग्यमंत्री पण होते आणि खासदार तर डाॅक्टरच आहेत. तरी केडीएमसीची आरोग्यसेवा थर्डक्लासच राहिली. खरंतर एखादे वैद्यकिय महाविद्यालय व दोन्ही शहरात एक एक सुसज्ज दवाखाना सहज उभारता आले असते. त्यामुळे भाजपाने पण आता जबाबदारी झटकण्याचे काम करू नये. या दोन्ही शहरांची दुर्दशा करण्यात दोन्ही पक्षांचा वाटा समान आहे. एकीकडे सत्ताधारी आरोग्यसेवा तयार करू शकले नाहीत म्हणून सध्या करोडो रुपये खर्च करून खाटा टाकायची कामं करत आहे. तर दुसरीकडे गेल्या २५ वर्षापासून युतीत असलेली भाजपा काही महिन्यापूर्वी वेगळी काय झाली जणू आम्ही त्यांच्यातले नाहीच अशा अविर्भावात जबाबदारी झटकण्याचे काम करत आहेत.लाॅकडाऊनला विरोध करून नंतर होणाऱ्या प्राणहानी वरून राजकारण करण्याचे जर कोणी मनात आणत असेल तर ते माणूसकीला धरून होणार नाही.
कोरोना काळात नुसतेच राजकीय आरोपप्रत्यारोप करायचे नाही हे आधीच ठरवले होते. परंतु आज महापालिका हद्दीत कोरोना बाधित रूग्णांची संख्या गेल्या १२/१३ दिवसापासून रोज साधारण ७ ते ८ मिनिटात एक रूग्ण या वेगाने वाढत आहेत. केडीएमसी कडे उपलब्ध बेड व रूग्णांची संख्या समान झाली आहे. अशावेळी प्रशासन याआधी घेतलेल्या लाॅकडाऊन काळात पुरेश्या सोई उपलब्ध करण्यात सपशेल कमी पडल्याचे दिसत आहे.म्हणून प्रशासनाने पुरेश्या सोई उपलब्ध करून देण्यासाठी १५ दिवसाचा ‘लाॅकडाऊन नव्हे कर्फ्यू’ घोषित करणे गरजेचे आहे. नाहीतर यापुढे रुग्णांना बेड न मिळाल्याने रस्त्यावर आपला प्राण सोडवे लागतील.म्हणून अशावेळी एक कडक लाॅकडाऊन घेणे गरजेचे आहे.
महापालिकेने सध्या ऑक्सिजन बेड व आयसीयु बेड वर फोकस करावा, आवश्यकता लागल्यास अधिक निधी उपलब्ध करून देईन ! पालकमंत्री एकनाथजी शिंदे
कडोमपा क्षेत्रातील वाढती रूग्ण संख्या पाहता महानगरपालिकेने आयसीयु बेड व ऑक्सिजन बेडस वर फोकस करावा, व्हेटिंलेटर्स विकत घ्यावेत. आवश्यकता लागल्यास अधिक निधी उपलब्ध करून देईन, असे आश्वासन पालकमंञी एकनाथजी शिंदे यांनी आज दिले. महापालिका क्षेञातील वाढत्या रूग्ण संख्येवर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टिने सर्वमताने चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या आचार्य अञे , नाटयगृहातील कॉन्फरन्स हॅाल मध्ये आयोजिलेल्या बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिले. महापालिकेने सदयाच्या परिस्थितीत बेडची संख्या वाढविणे तसेच कॉन्टॅक ट्रेसिंग ही वाढविणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी यावेळेस मांडले.
सदर बैठकीत प्रथमतः महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेची कोव्हिड ची सदयथिती व त्यासाठी महापालिका करीत असलेली उपाययोजना याबाबतची माहिती प्रोजेक्टरवर सर्व उपस्थितां समोर सादर केली. महापालिकेने कोव्हिड साठी काम करणा-या जबाबदार अधिका-यांची नावे कळवावीत व म्हणजे तातडीचे प्रसंगी संपर्क करणे सुलभ होईल अशी सुचना आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली. तर महापालिकेच्या शाळेत ऑन लाईन वर्ग चालू करावेत, या शाळांतील हुशार मुलांना / स्कॉलरशिप प्राप्त मुलांना , मी स्वखर्चाने टॅब पुरवेन, असे आश्वासन आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी दिले. महापालिका क्षेञातील कोव्हिड रूग्णांची वाढती संख्या पाहता स्थानिक पातळीवरती पुन्हा लॉकडाउन वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी यावेळेस केले, सदर बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ,महापौर विनिता राणे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार जगन्नाथ शिंदे तसेच अप्पर पोलीस आयुक्त दत्ताञय कराळे, पालिका स्थायी समिती सभापती विकास म्हाञे, सभागृह नेते प्रकाश पेणकर, विरोधी पक्ष नेते राहुल दामले, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, उपायुक्त विजय पगार, पल्लवी भागवत, रामदास कोकरे, उमाकांत गायकवाड, वैदयकिय आरोग्य अधिकारी सुरेशकदम, डॉ. पानपाटील , डॉ. सरवणकर पालिका सचिव संजय जाधव तसेच अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.
.