CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वृक्षारोपण करून पोलीस अधिकारी अविनाश पाटील यांनीं केला वाढदिवस साजरा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

वृक्षारोपण करून पोलीस अधिकारी अविनाश पाटील यांनीं केला वाढदिवस साजरा

कर्जत : जयेश जाधव / डोंबिवली: व्ही . शिवम

पर्यावरणाच्या होत असलेल्या ऱ्हासाने निसर्ग चक्र बदलत चालले आहे,त्याचे दुष्परिणाम पुढील पिढीस भोगावे लागू नये या साठी मोठया प्रमाणात आत्ताच वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे ही बाब ध्यानात घेऊन नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील साहेब यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वृक्षारोपण करण्याचे निश्चित केले व कळंब पोलीस चौकी परिसरात पोलीस बांधव यांच्या सह वृक्षारोपण केले .

 

कोरोनावर यशस्वीपणे मात करून आपल्या कर्तव्यावर रुजू झालेले नेरळ पोलीस स्टेशन चे कार्यतत्पर अधिकारी अविनाश पाटील यांनी आपला वाढदिवस एक सामाजिक उपक्रम राबवून करण्याचे ठरवले त्यानुसार ६ जुलै रोजी असणाऱ्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या कुटुंबीय व पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थित वाढदिवस साजरा केला.तसेच कळंब पोलीस चौकीच्या सुमारे २ एकराच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्ष व रोपांची लागवड करण्यात आली.

 

कोरोनावर यशस्वीपणे मात करत आपल्या सेवेत रुजू होताच एक आदर्शवत काम हाती घेऊन पोलीस स्टेशन परिसरात हिरवाई निर्माण व्हावी त्यासाठी सहकारी पोलीस कर्मचार्यांना प्रेरित करून अविनाश पाटील यांनी आपल्या वाढदिवशी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला व सोमवारी ६ जुलै ला कळंब पोलीस चौकी परिसरात नारळ, आंबा,पेरू ,चिंच, अश्या विविध प्रकारची फळ झाडे व औषधी वनस्पतीची व रोपांची लागवड केली.लावलेल्या प्रत्येक रोपांची संवर्धन करण्याची जबाबदारी नेरळ पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी घेऊन पोलीस स्टेशनचा परिसर गर्द हिरवाईने नटवण्याची ग्वाही दिली .

 

यावेळी पोलीस अधिकारी अविनाश पाटील यांच्या सौभाग्यवती शितलताई अ. पाटील , यांच्यासह कळंब पोलीस चौकीचे इन्चार्ज ए.एसआय. केतन सांगळे ,सावजी,,ठमके,पो.हवा. भालेराव,पो.ना.समीर भोईर , सुरेश बोडके, म.पो.नाईक.विद्या चव्हाण पो.शिपाई.नागरगोजे, निरंजन दवणे, एकनाथ गर्जे, संगीता गवस, प्रतीक्षा भामरे, होमगार्ड निरीक्षक राहुल पाटील, मनीष खुणे,समाजसेवक सुनील म्हसे उपस्थित होते.