CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

रोटरी क्लबच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलला डायलिसिस उपकरणे प्रदान

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

रोटरी क्लबच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलला डायलिसिस उपकरणे प्रदान

डोंबिवली ( प्रतिनिधी) : २५ जून रोजी क्लबच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ़ डोंबिवली ईस्ट सहसंचालित रोटरी विकास ट्रस्टच्या वतीने रोटरी डायलिसिस सेंटरचा उदघाटन सोहोळा रोटरीचे माजी प्रांतपाल सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या हस्ते पार पडला . रोटरी क्लब ऑफ़ डोंबिवली ईस्ट च्या वतीने ४ डायलिसिस उपकरणे एमआयडीसी येथील आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलला प्रदान करण्यात आली. त्यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट चे अध्यक्ष संतोष भणगे , क्लब सेक्रेटरी संदीप येल्लूरकर व अन्य ज्येष्ठ रोटेरिअन सहकारी उपस्थित होते.

 

रोटेरियन सुशिल सोनी , आचार्य ग्रुप चे रोटेरियन आनंद आचार्य , डीके फ्लॅग फाऊंडेशन चे सर्वेसर्वा फ्लॅगमॅन डॉ. राकेश बक्षी , ग्लोब ग्रुप चे रोटेरियन माधव सिंह व कल्याण डोंबिवली रनर्स ग्रुप यांचे या उपक्रमात अत्यंत मोलाचे योगदान होते. लाॅकडाऊनची सर्व बंधने पाळून रोटरी अध्यक्ष संतोष भणगे यांनी यानिमित्ताने क्लबच्या एका अतिशय महत्वाकांक्षी वैद्यकीय उपक्रमाचे स्वप्न पूर्ण केले.

 

आश्रय ट्रस्ट च्या वतीने डॉ अरुण पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तसेच आश्रय ट्रस्टच्या वतीने रोटरीचे या अत्यंत निकडीच्या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल आभार मानले.

 

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे , बातम्या लेख व जाहिरातीसाठी संपर्क - साधा.मोबा. ९६१९६३००३५ / ९९८७४९६१३६