CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कडोंमपाचा कारभार निमलष्कराकडे सोपविण्याची जनतेची मागणी कडोंमपाचा भोंगळ कारभार:कोरोनाची मुसंडी नागरिक भयभीत

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

कडोंमपाचा कारभार निमलष्कराकडे सोपविण्याची जनतेची मागणी कडोंमपाचा भोंगळ कारभार:कोरोनाची मुसंडी नागरिक भयभीत

डोंबिवली (क्राईम बॉर्डर रिपोर्टर बापू वैद्य ) : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना ची लागणाची दिवसेंदिवस मुसंडी मारत अनेक नागरिकांना घेरत आहे. त्यामुळे या महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.करोनाची लागण सुरूवातीला अल्पप्रमाणात होती पण राजाजीपथवरील लग्न समारंभ व डोंबिवली पश्चिमेला लग्नाचा स्वागत समारंभ यात कोणतेही नियम पाळले गेले नाही तेव्हापासून कोरोनाचा फैलाव होत गेला आजमितीला तर रोगाचा फैलावाची घौड दौड सुरू आहे.

 

कडोंमपाची दोन मोठी रुग्णालय असून तिथे तर प्रचंड प्रमाणात असुविधा आहेत. या रूग्णालयाच्या संबंधित असंख्य वेळा बातम्या प्रसिद्ध झाल्यात,आंदोलने झाली पण पालिका प्रशासन थंडच आहे . आता कोरोनाची लागण लागल्यावर काही प्रमाणात सुधारणा होत असल्यातरी उपचारासाठी इतरांवर म्हणजे मुंबई, ठाणे येथील रूग्णालयावर अवलंबून राहवे लागत आहे.डोंबिवली कल्याण परिसरातील खाजगी रूग्णालयात तर पेशंटना लुटण्याचे प्रकार जोरदार होत आहेत तसेच अनेक डॉक्टर साधा अजार असेल तरीही चाचण्या करण्यास भाग पाडत आहेत . अशा घटना दरदिवशी घडत आहेत,म्हणजे एक प्रकारे लुटारूंची टोळीच निर्माण झाली आहे.

 

महापालिका आयुक्त दररोज नवीन आदेश पारित करत असतात पण त्याची महापालिका क्षेत्रात योग्यरीत्या अंमलबजावणी होते का ? हा ही प्रश्न आहे, महापालिका कोरोना प्रभाव क्षेत्र सील करते मात्र तिथे योग्य रीतीने नियम पाळले जात नाही.याला पालिकेच्या प्रशासना प्रमाणे नागरिक ही तेवढेच जबाबदार आहेत.सील केलेल्या प्रभागातील दुकाने बंद करण्यात येतात पण रस्त्यावर बसणारे भाजी-फळे ,आणि इतर सटरफटर विकणारे तर असतातचं या विषयावर कोरोना फैलावास सुरुवात झाली त्यावेळेस काहीप्रमाणात कडक अंमलबजावणी होत होती ती आता राहिलेली नाही. डोंबिवली कल्याण परिसरातून शासकीय निमशासकीय कर्मचारी पालिका क्षेत्रा बाहेर कामासाठी जा ये करित असतात त्यावर बंधने होती ती पण आता दुर करण्यात येत आहेत.

 

या सर्व बाबतीत कोरोना वर कशी मात करून जनजीवन कसे मुळ पदावर येईल याकडे लक्ष देणे गरजे आहे ,आयुक्तांनी नुसते आदेश पारित करून त्याची पालिकेचे अधिकारी ,आरोग्य खाते अंमलबजावणी बजावणी करण्यासाठी टाळाटाळ करीत असतील तर त्यांच्यावर वर कठोर कारवाई केली पाहिजे. आणि हे जर पालिकाप्रशान करण्यास समर्थ नसेल तर संपूर्ण कडोंमपाचा कारभार काही काळा निमलष्कराकडे सोपविण्यात अशी मागणी जनतेकडून होत आहे.याविषयी नागरिक कडोंमपाच्या अंदाधुंदी कारभारस वैतागले आहे .

 

या सर्व बाबींचा विचार करून नागरिकांना वाटते कि ,कडोंमपाचा कारभार हाकण्याकरिता कडक शिस्तीचा आयुक्त हा लष्करी अधिकाऱ्यासारखा असावा.

 

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे ,बातम्या लेख व जाहिरातीसाठी संपर्क - साधा.मोबा. ९६१९६३००३५/९९८७४९६१३६