CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नाभिक व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसाठी अ.भा.जिवा सेनेतर्फे लाक्षणिक उपोषण

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

नाभिक व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसाठी अ.भा.जिवा सेनेतर्फे लाक्षणिक उपोषण

वसई : लॉकडाऊनमुळे उपासमार होत असलेल्या नाभिक व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसाठी अ.भा.जिवा सेनेच्या वतीने वसई तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले होते.प्रमुख मागण्यांमध्ये नाभिक व्यावसायिकांना सलून सुरू करू देण्यास परवानगी देणे.किंवा नाभिक व्यावसायिकाच्या बँक खात्यात दरमहा १०,०००/-रुपये जमा करणे.तसेच सोशल मीडियावर नाभिक समाजाची बदनामी करणाऱ्या विवेक लांबे या इसमावर कठोर कारवाई करणे इत्यादी मागण्याचा समावेश होता.

 

यावेळी वसईचे नायब तहसीलदार रोशन कापसे यांनी उपोषणकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.आणि तातडीने कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे हे निवेदन पाठवून देण्याचे आश्वासन दिले.या उपोषणास सलून असोसिएशन वसई शहर, राष्ट्रीय बहुजन विकास संघटना, पँथर रिपब्लिकन सेना,संत सेना महाराज नाभिक संघटना विरार यांनी पाठिंबा दिला होता.या उपोषणात अ.भा.जिवा सेना राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर,राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद तिगोटे,नाभिक समाज युनियन नालासोपारा शहरचे अध्यक्ष संतोष वाघ, नाभिक समाज युनियन नालासोपारा पश्चिमचे अध्यक्ष गणेश वैद्य आदी मान्यवर सहभागी झाले होते.

 

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे, बातम्या लेख व जाहिरातीसाठी संपर्क - साधा.मोबा. ९६१९६३००३५/९९८७४९६१३६