CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अंबरनाथमधील गृहनिर्माण सोसायटीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश आ. डॉ. बालाजी किणीकर यांचा हस्तक्षेप

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

अंबरनाथमधील गृहनिर्माण सोसायटीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश आ. डॉ. बालाजी किणीकर यांचा हस्तक्षेप

अंबरनाथ (क्राईम बॉर्डर रिपोर्टर ) : खोटी बिले सादर करून पैसे हडपणे, बँकेतील रक्कम परस्पर काढून घेणे, धनादेशावर खोट्या स्वाक्ष-या करणे, गृहनिर्माण सोसायटीच्या कामकाजासंदर्भातील सर्व नियम धाब्यावर बसवून अनिर्बंध कारभार करणे इत्यादी आरोप असलेल्या येथील मोहन ज्योत गृहनिर्माण सोसायटीच्या निलंबित सरचिटणीस आणि व्यवस्थापन समितीविरोधात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम ८३ अन्वये चौकशी करण्याचे आदेश अंबरनाथ सहकारी संस्था सहाय्यक निबंधकांनी दिले आहेत. एखाद्या गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिका-यांची चौकशी होण्याचे अंबरनाथमधील हे पहिलेच प्रकरण आहे.

 

येथील शिवमंदिर मार्गावरील मोहन ज्योत या गृहनिर्माण सोसायटीतील व्यवस्थापन समितीने २०१७-१८ आणि २०१८-१९ या कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले होते. या भ्रष्ट व्यवस्थापन समितीवर कारवाई करण्याची मागणी सोसायटीतील सदनिकाधारकांनी स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे केली. आमदार महोदयांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. सहकारमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश ठाण्याच्या जिल्हा उपनिबंधकांना दिले.

 

यासंदर्भात सहाय्यक निबंधक – सहकारी संस्था यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे की, ‘’प्राथमिक माहितीच्या आधारावर असा निष्कर्ष निघतो की, संबंधित गृहनिर्माण सोसायटी आणि तिचे सदस्य यांच्या हितरक्षणासाठी सर्व गैरव्यवहारांची चौकशी करणे गरेजेचे आहे. त्यामुळे मोहन ज्योत गृहनिर्माण सोसायटीच्या तत्कालीन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची चौकशी करण्याचे आदेश मी देत आहे’’. आपले गैरव्यवहार झाकण्यासाठी या सदस्यांनी सोसायटीच्या काही नोंदी नष्ट केल्या तसेच बँकेतून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम परस्पर काढून घेतल्याचे निदर्शनास आले असल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम ८३ अनुसार व्यवस्थापन समितीची स्थापना, तिचे कामकाज आणि सोसायटीची आर्थिक स्थिती या सगळ्याचा सखोल तपास करता येतो. मोहन ज्योत गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांच्या २२ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीत सोसायटीचा २०१८ आणि २०१९ चा लेखा परीक्षण अहवाल फेटाळून लावण्यात आला. या अहवालात सत्याची मुस्कटदाबी झाली असल्याचा सदस्यांचा आरोप आहे. त्यातच सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सोसायटीचे तत्कालीन सरचिटणीस किशन दुस्सेजा यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. चौकशी आणि योग्य लेखा परीक्षण होऊ नये यासाठी दुस्सेजा यांनी जी. एस. भुल्लर, विजय संगतानी आणि दिलीप खेतवानी या इतर सदस्यांच्या मदतीने प्रश्नकर्त्या सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे देत त्यांना धमकावण्याचाही प्रयत्न केला.

 

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या निलंबित व्यवस्थापन समितीतील किशन दुस्सेजा, घनःश्याम लुंड, महेश वाधवा आणि इतर सदस्य यांचा अनेक गैरव्यवहारांत सहभाग असल्याचे सोसायटीद्वारा स्थापित त्रिसदस्यीय समितीच्या निदर्शनास आले. सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत या त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. त्रिसदस्यीय समितीने निलंबित व्यवस्थापन समितीच्या भ्रष्टाचाराचे काही दाखलेही यावेळी सादर केले. त्यात खोटी जीएसटी बिले, खजिनदाराच्या मुलाला ११ लाखांचे कंत्राट देणे, बँकेतून १७ लाख रुपये परस्पर काढणे, जीएसटी आणि प्राप्तिकर नियमांचे उल्लंघन इत्यादींचा समावेश होता. तसेच ३० सप्टेंबर २०१८ रोजी व्यवस्थापन समितीची निवडणूक झाल्याची खोटी नोंदही या त्रिसदस्यीय समितीला आढळून आली. २ ऑगस्ट २०१८ या दिवशी सोसायटीची कोणतीही बैठक झालेली नसतानाही त्या दिवशी मंजूर झालेल्या ठरावाची खोटी प्रत सादर करून सोसायटीच्या बँक खात्यांचे परिचालन करण्यासाठी स्वाक्ष-या बदलण्यात आल्याचेही त्रिसदस्यीय समितीच्या निदर्शनास आले.

 

११४ सदनिका असलेल्या मोहन ज्योत गृहनिर्माण सोसायटीतील या भ्रष्टाचाराची माहिती सदनिकाधारकांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. भ्रष्टाचारी सदस्यांनी पुन्हा आपल्याच मर्जीतील सदस्यांची नियुक्ती करण्याच्या हालचालींना डॉ. किणीकर यांच्या प्रयत्नांमुळे चाप बसला. डॉ. किणीकर यांनी दोन वर्षांचे विशेष लेखा परीक्षण आणि अधिनियम ८३ अन्वये चौकशी होईपर्यंत सोसायटीची निवडणूकच घेतली जाऊ नये, या आशयाचे पत्र सहाय्यक उपनिबंधकांना लिहिले. त्यानंतर वरील सर्व कारवाईची चक्रे फिरली.

 

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे ,बातम्या लेख व जाहिरातीसाठी संपर्क - साधा.मोबा. ९६१९६३००३५/९९८७४९६१३६