CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली दि.११ जून२०२० ( बापू वैद्य ) : येथे गेली अनेक वर्षे नांदिवली स्वामी समर्थ चौकात दर्षी पावसाळ्यात बेफान पाणी साठून होणारा त्रास बंद व्हावा यासाठी नांदीवली मठाजवळील नागरीकांनी आमदारांना पत्रव्यवहार केला होता त्याबाबत आमदारांनी आज पाहणी दौरा केला.
सदर पाहणी दौऱ्यामध्ये महिला व पुरुष रहिवाश्यांनी गेली अनेक वर्षे होणाऱ्या त्रासाबद्दल आमदारांना अवगत केले व सदर त्रासातून कायमची मुक्तता करावी अशी विनंती केली. यावेळी आमदार राजू पाटील यांनी येत्या पावसाळयात तात्पुरत्या स्वरुपात काय करता येईल याची माहिती उपस्थितांना दिली.पाणी साचू नये यासाठी संबंधित विभागाला तात्काळ सूचना दिल्या त्याचबरोबर संभाव्य धोका टाळण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंप व बोटी स्वखर्चाने उपलब्ध करुन देऊ असे सांगितले त्याचबरोबर नांदिवली नाला भर टाकुन बुजवण्यात आल्याचे निदर्शनास येताच हा नाला तात्काळ मोकळा करण्यास अधिकारी वर्गाला सांगितले.दिवाळी नंतर सदर रस्त्यावर दोन्ही बाजुस गटारे व भूमीगत गटार व पक्का रस्ता करुन दिला जाईल असे यावेळी आमदारांनी जनतेला सांगून आश्वस्त केले.यावेळी परीसरातील नागरीकांनी पत्र दिल्यावर लगेच त्याची दखल घेऊन पाहणी केल्याबद्दल आमदार राजू पाटील यांचे आभार मानले.
सदर पाहणी दौऱ्याच्यावेळी आमदार राजू पाटील,माजी नगरसेवक मनोज घरत,हर्षद पाटील महापालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंता किरण वाघमारे,ड्रेनेज विभागाचे मालगुंडी माजी सरपंच रवि म्हात्रे व पत्रकार ,परिसरातील शेकडो नागरीक उपस्थित होते.
मुख्य संपादक : राजेंद्र वखरे ,
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - ९६१९६३००३५/९९८७४९६१३६