CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नागरिकांशी कोरोना विषाणू संबंधी आणि स्वच्छते विषयी जनजागृती

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

नागरिकांशी कोरोना विषाणू संबंधी आणि स्वच्छते विषयी जनजागृती

कल्याण : नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्य - सौ. माधुरीताई प्रशांत काळे यांनी दि. ०७ जून २०२० रोजी यशवंत हाईट्स संकुलात येथील समस्त नागरिकांशी कोरोना या विषाणू संबंधी आणि स्वच्छते विषयी जनजागृती व संकुलातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात केले . त्यांच्या या अनमोल सहकार्याबद्दल समस्त यशवंत हाईट्स संकुलातील रहिवाशी कडून जाहीर आभार मानण्यात आले. तसेच सौ. माधुरीताई यांच्याकडून समस्त संकुलासाठी Temperature Gun,Arsenic Album 30 Tablet, Sanitizer Stand, 5 litre Sanitizer देण्यात आले.

 

कोरोना पार्श्वभूमी वर नियंत्रण मिळवणे आणि सध्याच्या परिस्थितीत आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी परीसरामध्ये विविध सोसायटी, इमारती, चाळी येथे प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या द्रष्टीने नगरसेविका सौ. माधुरी प्रशांत काळे याच्यां सौजन्याने व विजयनगर हौसिंग फेडरेशन मर्या. याच्यां विशेष सहकार्या ने सेनेटायझर स्टॅडं, प्लस चेकींग मशिन, टेम्परेचर थरमल गन, सॅनेटायझर लिक्वीड, Arsenic Album-30 गोळ्यांचे मोफत वाटप सोसायटीचे पदाधिकारी , स्थानिक शिवसेना शाखेचे पदाधिकारी व शिवसेना नगरसेवक कार्यालयामार्फत सुरु केले आहे. या गोळ्या होमिओपेथिक असून याचे कुठलेही दुष्परिणाम नसून केंद्राच्या आयुष मंत्रालया तर्फे या सूचित केल्या आहेत. व तज्ञ डाॅक्टर याच्यां सल्याने प्रभागा मध्ये तसेच आजुबाजुचा परीसर तसेच प्रभाग येथे नागरिकांच्या मागणी प्रमाणे देण्यात येत आहेत तसेच परीसरातील सर्व मेडीकल प्रॅक्टिक नर्स डाॅक्टर्स याच्यां क्लिनीक मध्ये Temperature Gun, pulseMeter उपलब्ध केले असुन नागरीकाच्या मागणी अनुशंगाने व येणाऱ्या पावसामध्ये उदभवणारे साथीचे आजार यांवर प्रतिबधांत्मक उपाययोजना म्हणून हि सुविधा सुरू केली आहे, या सेवेचा मोफत फायदा देणयात येणार आहे, या सुविधा कोरोणा सपुंष्ठात येई पर्यंत सुरू राहणार आहेत.

 

त्याचा एक भाग म्हणून यशंवत हाईट्स आमराई येथे नगरसेविका सौ. माधुरी प्रशांत काळे याच्यां शुभहस्ते आणि शिवसेना महीला उप सघंटक सौ . सुरेखा बनसौडे, उपविभाग प्रमुख अनंत आब्रें, उपशाखा प्रमुख विकास गुरव, योगेश नाईक, प्रदिप पवार, गटप्रमुख भिम रेणोसे, तसेच दशरथ कसलकर, परदेशी सर,राहुल झावरे, योगेश ननावरे याच्यां सह सोसायटी चे सभासद च्या उपस्थिती मध्ये करण्यात आली या वेळी यशवंत हाईटस चे पदाधिकारी व सभासद याच्यां उपस्थिती मध्य सुरूवात करण्यात आली. अधिक माहितीसाठी संपर्क : नगरसेवक जनसंपर्क कार्यालय,५-अजिंक्य, दर्शना अपा.विजयनगर, कल्याण पूर्व ०२५१-२२५०००९/९८२१८३८८५२ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - ९६१९६३००३५/९९८७४९६१३६