CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

प्रेयसीने प्रियकराचे उद्ध्वस्त केले आयुष्य,कुटुंबाचा गेला आधार - महाजन कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत

CRIME BORDER | 26 December 2025 | 03:41 PM

प्रेयसीने प्रियकराचे उद्ध्वस्त केले आयुष्य,कुटुंबाचा गेला आधार - महाजन कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत


 पंचनामा - स्पेशल रिपोर्ट - राजेंद्र वखरे 

डोंबिवली  : खरंच प्रेम असतं का ? अशी म्हणण्याची वेळ आत्ता आली आहे .प्रियकर व प्रेयसी हे एकमेकाला भेटतात ,ओळखतात आणि मग मैत्री होते आणि ठरवूनच त्यांचं प्रेम होतं एकमेकाला ते प्रपोज करतात आणि जीवनभर एकत्र राहण्याच्या, एकमेकाला साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. आणि त्यांचे प्रेमाचे पर्व सुरू होते परंतु त्यांचे हे खरोखरच प्रेम असतं का? अशा शंका आता प्रत्येकाच्या मनी यायला लागल्या आहे .अलीकडे प्रेमाच्या नावाखाली अनेक विभत्स प्रकार बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. जगामध्ये आपली संस्कृती ही महान संस्कृती म्हणून  गणल्या जाते. 


आपण स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व देतो त्यांचा आदर, सत्कार करतो. कवी - मंगेश पाडगावकर म्हणतात की , प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !  


परंतु आता तर प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम नसतं तर प्रेम फक्त स्वार्थापोटी केलेलं प्रेम असतं असं म्हणायची वेळ आलेली आहे .यामध्ये दोघं प्रेयसी व प्रियकर जर खरोखरच एकमेकांवर प्रेम करत असतील आणि आयुष्यभर एकमेकाला साथ देणार असतील तर त्या प्रेमाला आपण खरोखरच प्रेम असं म्हणू शकतो परंतु अशा काही घटना आपण वृत्तपत्रातून ,समाज माध्यमातून इंटरनेटच्या  तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून विविध बातम्या आपण वाचत असतो ऐकत असतो.यामध्ये प्रियकर प्रेयसीचा विश्वासघात करतो तिला ब्लॅकमेल करतो तिच्याकडे पैशाची मागणी करतो असे प्रकरण आपण बघतो परंतु या उलट आता प्रेयसीच ही प्रियकराला प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याचा उपभोग घेऊन त्याच्या भोळ्या भाबड्या  प्रेमाचा फायदा घेऊन त्यांना उल्लू बनवून आपले काम साध्य करतांना दिसत आहेत.व त्यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवतांना दिसत आहेत , परंतु यामध्ये सर्वच मुली ,स्त्रिया वाईट आहे असं म्हणता येणार नाही परंतु गव्हाबरोबर किडे ही रगडल्या जातात . 


अशाच प्रकारे सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावातील एका तरुणाचं आयुष्य एका प्रेयसीने उद्ध्वस्त केल्याचे समोर आले आहे त्याबाबत हा सविस्तर उत्तम.


धामणी तालुका , पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नाभिक समाजातील महाजन कुटुंबात जन्मलेल्या सत्तावीस वर्षीय अजय प्रकाश महाजन या युवकाने त्याच्या राहत्या घरातच आत्महत्या केल्याची घटना दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी उघडकीस आली होती.


प्रकाश महाजन यांना दोन मुले व दोन मुली असून अजय हा लग्नकार्य, उत्सव ,समारंभ अशा विविध  ठिकाणी डेकोरेशन करण्याचा व्यवसाय करीत होता.तर अजयचा दुसरा भाऊ वडिलांना शेतकामात मदत करायचा तसेच ते पारंपारिक नाभिक समाजाचा केस कापण्याचा व्यवसाय करून हे कुटुंब अतिशय सुखी समाधानाने जीवन जगत होते. श्री . प्रकाश महाजन यांच्या दोन्ही मुलींचे त्यांनी यथावकाश लग्न लावून दिले असून त्यांच्या  दोन्ही मुली एक बदलापूरला व दुसरी डोंबिवली येथे आनंदाने संसार करीत आहेत.


अजय हा मित्र मंडळीत सर्वांचाच लाडका होता . तो डोंबिवली येथे बहिणीकडे येऊन जाऊन असायचा.अजयच्या  कॉलेज जीवनापासूनच त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली होती. त्या दोघांची चांगली ओळख असल्याने दोघात चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.  मग ते दोघेजण एकत्र हिंडणे, फिरणे, हॉटेलात जेवण करणे,कपडे घेणे त्यांचे अधून मधून असे सुरू होते. अजयने यथावकाश त्याच्या घरी  सांगितले की माझे एका मुलीवर प्रेम आहे व मी त्या मुली सोबत लग्न करणार आहे.  घरच्यांनी त्या मुलीची विचारपूस केली आणि त्यांनी त्याला लग्नाची संमती दिली.  ती मुलगी अजय सोबत त्यांच्या बहिणीकडे डोंबिवली , बदलापूर अशा ठिकाणी जायची त्यांच्याकडे राहणे ,खाणे पिणे व्हायचे. 


एव्हाना त्या दोघांनी लग्न करण्याचे पक्के केले होते. अजय हा भविष्यातील स्वप्न बघत होता. तो खूप खूष होता . लग्न झाल्यानंतर आपण कसे वागायचे ? कुठे सेटल व्हायचे ? याबाबत तो आपल्या बहिणीशी बोलत असायचा मित्रांशीही तो बोलायचा. कालांतराने अजयची मैत्रीण ही गाव सोडून घणसोली /मुंबई या ठिकाणी तिच्या कुटुंबासह राहायला गेली. या ठिकाणी आल्यानंतर तिने काही दिवसानंतर अजयला टाळाटाळ करायला सुरुवात केली. अजयने याबाबत विचारणा केली असता तिने सांगितले की माझे आई-वडील व नातेवाईक तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी मनाई करीत आहे आणि मी दुसरीकडे लग्न करणार आहे . हे ऐकून अजय हडबडला त्याने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केले . त्यानंतर अजयने त्या मुलीच्या आईशी संपर्क साधला.  त्यांना सांगितले की माझे तुमच्या मुलीवर प्रेम आहे व मी तिच्याशी लग्न करणार आहे तुम्ही आमहहला परवानगी द्या . 


त्यानंतर मात्र त्या मुलीच्या आई व नातेवाईकांनी अजयला शिव्या देऊन त्याचे मानसिक खच्चीकरण करून त्याला धमक्या द्यायला सुरुवात केली.  अजयचे मात्र तिच्यावर जीवापाड प्रेम असल्याने हा धक्का त्याला सहन झाला नाही आणि त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.  आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहिली त्या सुसाईड नोट मध्ये अजय म्हणतो की,


मी स्वतः अजय महाजन माझ्या बाबतीत आत्ता जे काय झालंय ते मी केलेल्या खऱ्या प्रेमाचा फळ आहे मी एकाच मुली सोबत म्हणजे रिता मुक्काम मराठवाडी, पोस्ट ढेकेवाडी सध्या राहणार घनसोली तिच्यासोबत दोन वर्षापासून रिलेशनशिप मध्ये आहे. तिने माझ्या भावनांशी खेळून मला खूप मानसिक त्रास दिला आहे . माझं  आयुष्य संपवण्यासाठी मला माझी प्रेयसी व तिची आई आणि तिची बहीण व तिचा दाजी आणि माझ्या प्रेयसीचा एक मित्र अशा सगळ्यांनी मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आहे . माझे खच्चीकरण केले आहे. मला आयुष्यातून संपवले आहे.  या सर्वांनी मिळून एक प्लॅन करून मला फसवलं मला धोका दिला. त्यामुळे मला खूप  मानसिक त्रास होतोय आणि म्हणूनच मी आत्महत्येचा निर्णय घेतलाय . 


मी व माझी प्रेयसी लग्न करणार होतो पण तिने माझ्यासोबत खोटे प्लॅन करून फक्त मला अडकवण्याचा प्रयत्न केला . माझ्या भावनांशी ती खेळली . या सर्व गोष्टींचा पुरावा माझ्या फोनमध्ये आहे. एवढेच नव्हे तर अजयने त्याच्या फाईल मॅनेजर मध्ये तो कोणा कोणाशी बोलला आहे , त्याचे कॉल रेकॉर्ड त्याने सेव करून ठेवले आहेत.  त्याचबरोबर त्याचे व त्याच्या प्रेयसीचे स्क्रीन शॉट फोटो व व्हिडिओ गॅलरी मधील आदर फाईल मध्ये ते फोटो आणि व्हिडिओ त्याने सेव्ह केलेले आहेत . त्याचबरोबर गुगल फोटो व सर्च बाय यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी करतील असं त्याने पत्रात लिहिल आहे. त्या पत्रामध्ये त्याने पाच लोकांवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे लिहिलेले आहे.


सदर घटना उघडकीस आली असता महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला असून  अजय हा एक समजूतदार व गावात आणि मित्रमंडळीत सर्वांचा आवडता होता .


सदर घटने संदर्भात ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून विविध अंगाने पोलीसांनी तपास करीत असल्याचे सांगितले परंतु त्या तपासातून काहीच निष्पन्न झाले नसून पोलीसांनी सखोल चौकशी करून आत्महत्या करणाऱ्या दोषींवर कडक  कायदेशीर कारवाई करावी.  यासाठी स्वाभिमानी नाभिक संघटनेतर्फे पोलीसांना संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच नाभिक समाजातील बांधवांनी सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी स्वाभिमानी नाभिक संघटनेचे  राज्य कार्याध्यक्ष प्रदीप काशीद, जिल्हा अध्यक्ष अधिकराव चव्हाण ,  जिल्हा सरचिटणीस संदीप पवार,तालुका अध्यक्ष बाबुराव पवार, जिवाजी महाले उत्सव समितीचे सदस्य विष्णू सपकाळ, तालुका उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड ,तालुका सचिव निळकंठ पवार ,विभाग प्रमुख दाजी सुर्वे ,उंब्रज शहराध्यक्ष तानाजी भदिंगे आदींसह सदस्य समाज बांधव उपस्थित होते.


परंतु अद्याप पावेतो अजयला न्याय मिळाला नसून दि . ४ फेब्रुवारी २०२४ रोजी या घटनेला २ महिने पूर्ण होतील. विविध नाभिक संघटना लवकरच या घटनेबाबत पोलीसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजते.


स्पष्टपणे सुसाईड नोट मध्ये आत्महत्या केलेल्यांची नावे असून सुद्धा पोलीसांनी अद्याप ठोस कारवाई केली नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.व संघटनांचे म्हणणे आहे . हसत्या खेळत्या कुटुंबातील अजयने आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्व कुटुंब सैरभैर झाले असून हे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत


यासंदर्भात स्वाभिमानी नाभिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी सदस्य तसेच नाभिक बांधवांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन सादर केले आहे.  यावेळी एपीआय अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येऊन आत्महत्येस प्रवृत्त  करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी व अजयला न्याय द्यावा अशी मागणी करून या प्रकरणाची फेर चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. 


आकाशात दिसती हजारो तारे ,पण चंद्रासारखा कोणी नाही.,लाखो चेहरे दिसतात धरतीवर,पण माझ्या भावासारखा कोणी नाही. असं म्हणत अजयच्या बहिणी अश्रूंना वाट करून हमसून हमसून रडतांना आई - वडिलांना व दुसऱ्या भावला सांत्वन देत आहेत . 


या संदर्भात लवकरच  जेष्ठ पत्रकार , व  क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वखरे हे समाजाच्या वतीने पुढील रूपरेषा ठरविणार आहेत.