CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवलीत धार्मिक कार्यक्रमांना बंदी असतांना जैन मंदिरात साधू आले,गुन्हा दाखल

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

डोंबिवलीत धार्मिक कार्यक्रमांना बंदी असतांना जैन मंदिरात साधू आले,गुन्हा दाखल

डोंबिवली : (बापू वैद्य): लॉक डाऊनच्या काळात धार्मिक कार्यक्रमांना बंदी असतांना आणि संचारबंदी लागू असताना देखील डोंबिवली मधील भोपर येथील लोढा-रिजन्सी येथे जैन मंदिरात ३५ साधू आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सर्व साधू हे मुंबई मधील कंटेंटमेंट झोन मधून आले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.तसेच काही जण इथे रोज येत आहे असेही सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून विविध आवाहन केली जात आहेत. त्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून धार्मिक कार्यक्रमांना बंदी करण्यात आली आहे. असे असूनही नुकतेच डोंबिवली येथील भोपर परिसरात धार्मिक विधी साठी अनेक साधू मुंबई येथील घाटकोपर या कंटेंटमेंट झोन मधून आल्याचे स्थानिक नागगरिकांनी समोर आणले आहे. हे साधू आले परंतु त्यांनी परवानगी घेतली आहे का? त्यांची कोविड टेस्ट झाली आहे का? आणि जर एखादा साधू कोरोना पॉझिटिव्ह असेल तर याला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. तर वारंवार तक्रार करून देखील पोलिसांनी काही लक्ष दिले नाही आणि साधू मंदिरात आले असल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले. मात्र मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.डोंबिवली काही जैन मंदिर चालू असतात त्यात भाविक येत जात असतात असे काही डोंबिवली मधील नागरिकांनी सांगितले.त्यामुळे या मंदिरांना आणि बाकीच्या मंदिरांना वेगळा न्याय आहे का? असा सवाल सुद्धा आता नागरिक करू लागले आहेत.तर गेल्या काही वर्षात डोंबिवली बिल्डिंगला गुजराती भाषेत नाव देणे,नॉनव्हेज खाणाऱ्यांना बंदी,फक्त गुजराती-मारवाडी-जैन लोकांसाठी क्रिकेट स्पर्धा असे प्रकार सुद्धा घडले आहेत.त्यामुळे मराठमोळ्या आणि सांस्कृतिक शहराची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे....

 

संचारबंदी असल्याने खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकांना जमण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही नियमांचा भंग करून सदर ठिकाणी गर्दी केल्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्यात भद्रेश दोशी (ट्रस्टी) वर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यातआला आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे , मानपाडा पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी . भापकर करीत आहे .