CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मनसे आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

मनसे आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

डोंबिवली (बापू वैद्य) : राज्यातील कोरोनाग्रस्तांना शासनाने मोफत उपचार मिळावेत यासाठी मनसे आमदार राजू पाटील सर्वात प्रथम मागणी केली होती आणि पाठपुरावा सुद्धा केला होता. तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे कोरोनारुग्णांना मोफत उपचार मिळावा अशी स्वतंत्र योजना सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सुद्धा कोरोनारुग्णांना मोफत उपचार मिळावा अशी मागणी केली होती. मात्र या पाठपुराव्याला यश आले असून राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

कल्याण डोंबिवली सह ठाण्यात रुग्णांकडून शुल्क आकारायला सुरुवात झाल्याने नागरिकांना मोफत उपचार दिला पाहिजे आणि राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार पद्धतीमध्ये त्रुटी आहेत.वास्तविक शासनाकडून कोविड-19 रुग्णांसाठी मोफत उपचार देण्याची घोषणा करण्यात आली असेल तर अशा पध्दतीने बिल आकारण्याबाबत पत्रक कसे काढण्यात आले आहे, त्यामुळे सर्वजण संभ्रमात आहेत. त्यामुळे शासनाच्या निर्णयामध्ये अधिक स्पष्टता करून शासन निर्णय राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना लागू करण्याची आवशकता आहे.तरी सरकारने तातडीने या विषयाची दखल घेऊन राज्यातील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देण्याबाबतच्या निर्णयाबाबत सर्व रुग्णालयांना स्पष्ट आदेश द्यावेत.अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे केली होती.तसेच पत्रव्यवहार आणि ट्विट सुद्धा केले होते.मात्र या पाठपुराव्याला यश आले असून राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.याबाबत परिपत्रक सुद्धा राज्यशासाने काढले असून याबाबतचे सीएमओ महाराष्ट्र तर्फे ट्विट सुद्धा करण्यात आले आहे.