CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : येथील जेष्ठ पत्रकार सदाशिव उर्फ बापू वैद्य यांचा २२ मे रोजी ७५ वा वाढदिवस घरगुती वातावरणात साजरा झाला .बापू हे गेली ४५ वर्षे पत्रकार म्हणून विविध मराठी, इंग्रजी, दैनिक ,साप्ताहिकामध्ये कार्यरत आहे,तसेच ते सामाजिक संस्थाशी निगडित असून त्यांची निस्वार्थ कामे सुरु आहेत,त्यांनी अंशकालीन पत्रकारांची संघटना स्थापना करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केली आहेत कारण त्यांचा उद्देश आहे कि, अंशकालीन पत्रकार म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांना मानधन तुटपुंजे असते व तेही वेळेवर मिळत नाही, तसेच काही घटना घडली तर संपादक पाठीशी उभे राहत नाही, किंवा त्याचे म्हणणेही ऐकून घेत नाही, तसेच त्या पत्रकारला न सांगता बातम्या लावण्याचे बंद करणे अशी अनेक कारणे आहेत त्यासाठी अंशकालीन पत्रकार संघटनेची जरूरी आहे.असे बापूंना वाटते आणि लवकरच ते यासाठी अशी संघटना उभी करणार आहेत.त्यांच्या वाढदिवसा निमित्त क्राईम बॉर्डर चे संपादक तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वखरे यांनी शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांना शासनाने आधिस्विकृती पत्रकार म्हणून ओळख पत्र दिले आहे.ते सीकेपी बँक बचाव समितीचे प्रमुख म्हणून काम करीत असून आता जरी बँकेचा परवाना रद्द झाला असला तरी खाते/ठेवीदार यांना त्याचे पैसे परत लवकरच मिळवेत यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.ते १६वर्षे मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचा सदस्य होते ,तसेच प्रेस क्लब मुंबई चे १४ वर्षे सदस्य होते.आता ठाणे जिल्हा पत्रकार संघ,डोंबिवली पत्रकार संघ,एनयूजे सदस्य ते आहेत.त्यांचे सर्वांशी प्रेमाचे व आपुलकीचे संबंध आहेत.
लॉकडाऊन असल्याने प्रत्यक्ष भेट न घेता अनेकांनी त्यांना फोन वरून शुभेच्छा दिल्या.