CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाणे क्राईम ब्रँचचे व.पो.नि.नितिन ठाकरे महासंचालक पदकाने सन्मानित

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

ठाणे क्राईम ब्रँचचे व.पो.नि.नितिन ठाकरे महासंचालक पदकाने सन्मानित

डोंबिवली (कार्यालय प्रतिनिधी ) : ठाणे क्राईम ब्रँच - युनिट १ चे व.पो.नि. नितीन ठाकरे यांनी आपला पदभार हाती घेतल्यापासून अनेक गुन्ह्यांचा छडा लावून अनेक उल्लेखनीय कार्य केले.यात प्रामुख्याने आतंरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीला अटक, चेकमेट चं १२ करोड रुपये वसुली, पेट्रोल पंप पेट्रोल चोरी, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश,डांस बार वरील कारवाई,जुगार अड्ड्यावर कारवाई,साखळी चोर व मुद्देमाल हस्तगत अशा अनेक गुन्ह्यांचा यशस्वीरित्या तपास केला आहे. ठाकरे हे दिर्घ अनुभवी पोलीस अधिकारी असून किचकट गुन्हाही ते अतिशय सहजतेने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने उघड करतात. कोणताही न उलगडला जाणार तपास ठाकरे याच्याकडे वरिष्ठ विश्वासाने देतात .


अनेक जुन्या गुन्ह्याचा तपास व.पो.नि.नितीन ठाकरे यांनी पोलीस खात्यातील दिर्घ अनुभवाच्या जोरावर आणि टीमच्या मदतीने सोडविले आहेत. ठाणे आयुक्तालयात ठाकरे हे त्यांच्या कामाने प्रसिद्ध आहेत.ते जिथेही बदलून जातात तिथे आपला वेगळा ठसा उमटवतात.त्यांच्या हा ता खाली काम करणारे अधिकारी व कर्मचारी सांगतात कि , आम्हाला नेहमी साहेबांकडून नवीन काहीतरी शिकायला मिळते.ते वेळप्रसंगी कर्तव्यावर असतांना कठोरही होतात.पण ते सर्वांनाच हवे हवेसे वाटतात.नुकतेच ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते महासंचालक पदक व.पो. नि.ठाकरे यांना बहाल करण्यात आले.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य संपादक राजेंद्र वखरे - संपर्क - ९६१९६३००३५