CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मनसेच्या आमदार राजू पाटील यांनी कोरोना रुग्णांसाठी खाजगी आणि स्वतःच्या कुटु

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

मनसेच्या आमदार राजू पाटील यांनी कोरोना रुग्णांसाठी खाजगी आणि स्वतःच्या कुटु

डोंबिवली/दिवा :--कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा हा 50 पेक्षा जास्त आहे तर आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाबाधित रुग्णाला थेट मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवावे लागत होते. त्यातही रुग्णाला नेण्यासाठी योग्य सुविधाही नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता.हीच बाब लक्षात घेऊन राजू पाटील यांनी शहरातील एखादं खासगी रुग्णालय उपचारासाठी ताब्यात घ्यावं असा सल्ला पालिका आयुक्तांना दिला होता. तसंच आपल्या ताब्यातील असलेलं शहरातील आर.आर. हॉस्पिटल पालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल त्यांनी तशी तयारीही दाखवली होती.

अखेर आयुक्तांनी राजू पाटील यांनी दिलेला सल्ला मान्य करत रुग्णालय ताब्यात घेण्यास परवानगी दिली आहे.आयुक्तांच्या या परवानगी नंतर डोंबिवली शहरातील आर.आर.हॉस्पिटल हे पालिकेनं आपल्या ताब्यात घेतलं आहे. याबद्दल राजू पाटील ट्वीट करून माहिती दिली आहे.राजू पाटील आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, 'कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीत पहिला COVID + रूग्ण सापडल्यानंतर आयुक्तांना डोंबिवलीतील एखादा खाजगी दवाखाना फक्त COVID19 साठी घ्यावा अशी सुचना केली होती.आवश्यकता वाटल्यास आमचे RR हॉस्पिटल तात्पुरते ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती,ती मान्य झाली.येथे IMA च्या डाॅक्टरांचे सहाय्य घेऊन उपचार केले जातील.'दरम्यान, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यानंतर या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय योजना केल्या आहेत. याबद्दल राजू पाटील यांनी आढावा घेतला. तसंच लॉकडाउनमध्ये नागरिकांना कशी मदत करता येईल, याबाबत सहाय्यक आयुक्त डॉ.सुनिल मोरे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी, निलेश पाटील, तुषार पाटील, अँड.आदेश भगत, विजय भोईर,सचिन भोईर,तेजस पोरजी आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दिवा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय योजना केल्या आहेत याचा घेतला आढावा..दिव्यात लॉकडाउनमध्ये नागरिकांना कशी मदत करता येईल याबाबत केली पालिका अधिकारी आणि कार्यकर्त्यांशी केली चर्चा..