CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवलीत सामाजिक अंतराचा फज्जा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

डोंबिवलीत सामाजिक अंतराचा फज्जा

आज संपूर्ण जगातील १८१ देशात कोरोना या विषाणूची लागण झालेली आहे . अमेरिकेत सर्वाधिक कोरोणाग्रस्त व्यक्ती आहेत. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा कोरोणा या विषाणूने शिरगाव केला असून आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्याचे गांभीर्य ओळखून संपूर्ण देशात लोक डाऊन केला आहे .आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तत्पूर्वीच महाराष्ट्र लाॅक डाऊन केला . सर्व जगाला व भारतालाही सामाजिक अंतर सोशल डिस्टन्सिनचे महत्त्व समजले आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे जनतेला आवाहन करीत आहे .विनंती करीत आहे की ,आपण घरांमध्येच बसा आणि सुरक्षित रहा . बाहेर गर्दी करू नका फिरू नका . कारण कोरोणा विषाणूमुळे संसर्ग होऊन अनेक पेशंट तयार होतील आणि मग आपला भारतदेश तिसर्‍या स्टेजवर गेला तर आपल्याला हे थांबवता थांबवता नाकीनऊ होईल. याचेच ज्वलंत उदाहरण विविध ठिकाणी आपल्या पाहायला मिळत आहे . ठिक ठिकाणी नागरिक , पोलीस ,प्रशासन खूप चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे .पण काही ठिकाणचे चित्र पाहता अजून या लोकांना या कोरोणाचे गांभीर्य समजलेले दिसत नाही.

दिनांक ५ एप्रिल 2020 रोजी सकाळी साडेनऊ वाजता क्राईम बॉर्डर चे रिपोर्टर यांनी डोंबिवली पश्चिम येथील काही भागाची पाहणी केली . डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभाग क्षेत्र ते विष्णुनगर पोलीस स्टेशन या प्रमुख रस्त्याची पाहणी केली तेव्हा नागरिकांनी भाजीपाला व दैनंदिन गरजेच्या वस्तू घेण्यासाठी बाजारात गर्दी केलेली आढळली ‌या ठिकाणी सोशल डिस्टन्सिनचा फज्जा उडालेला दिसला .एकीकडे डोंबिवलीत कोरोणाचे पेशंट्स वाढताना दिसत आहेत. परंतु अजूनही नागरिकांनी ते गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. हे या घेतलेल्या व्हिडीओ वरून दिसत आहेत . त्याच बरोबर डोंबिवलीतील नवापाडा या मुख्य रस्त्यावर सुद्धा दैनंदिन गरजेच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आढळली . काही दुकानदार वगळता ,दुकानदारांनी भाजीपाला विक्रीसाठी सर्व नियम धाब्यावर ठेवलेले आढळले आहे . ह प्रभाग क्षेत्र ते गोपी मॉल गुप्ते रोड डोंबिवली स्टेशन या रस्त्यावर गर्दी अजिबात दिसली नाही .काही नागरिक नियमांचे तंतोतंत पालन करताना आढळले .पोलीस व प्रशासन आपले काम करीत आहे . काही भाग शीलहि करण्यात आलेला आहे .परंतु हे काम फक्त प्रशासनाचे व पोलिसांचे नसून हे सर्व नागरिकांची आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे जर नागरिकांनी अशीच गर्दी केली तर डोंबिवलीत कोरोना या विषाणूची लागण वाढायला वेळ लागणार नाही.