CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वीजेच्या खांब्यावरून खाली पडल्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू धरणगावातील घटना

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

वीजेच्या खांब्यावरून खाली पडल्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू धरणगावातील घटना

Dr. Shashikant Kale / Kalpesh Chaudhri

जळगाव : वीजेच्या खांब्यावरून खाली पडल्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धरणगाव येथे आज २५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. दिलीप देवा भिल वय ३६, रा. गारखेडा, ता. धरणगाव असं मयत झिरो वायरमनचं नाव असून याबाबत धरणगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दिलीप भिल गारखेडा गावात आपल्या आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. ते मागच्या १० वर्षांपासून धरणगाव येथील महावितरण कार्यालयात ठेकेदारी तत्वावर ‘झिरो वायरमन’ म्हणून कार्यरत होते. दुरुस्तीतून येणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह सुरू होता.

नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ते महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत धरणगाव शहरातील लोहार गल्ली परिसरामध्ये इलेक्ट्रिक खांब्यावर काम करण्यासाठी गेले होते. यावेळी दिलीप भिल खांब्यावर चढून काम करत असताना, अचानक ते. जमिनीवर कोसळले (नेमका ईलेक्टीक शॉक लागला किंवा तोल जावून पडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.) खांब्यावरून पडल्याने त्यास गंभीर दुखापत झाली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्यास तात्काळ उचलून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती दिलीप यास मृत घोषित केले. या संदर्भात धरणगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, दिलीप भिल कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ असल्याने आणि कामावर असताना अपघात झाल्याने, मयत तरुणाच्या कुटुंबीयांना महावितरणकडून भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी एकलव्य संघटनेने केली आहे.

sabhar जळगाव लाईव्ह न्यूज