CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

गावठी अग्निशस्त्र बाळगणारे आरोपी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

गावठी अग्निशस्त्र बाळगणारे आरोपी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

नयना चौधरी यांजकडून

वरणगाव : डॉ. श्री . महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना जिल्ह्यात अनेक इसम दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर गोपनीय माहिती काढून कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते .

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना गोपनीय रित्या दिनांक ४/५/२५ रोजी माहिती मिळाली असता त्यांनी एक पथक तयार करून सापळा रचत काळया लाल रंगाची पल्सर मोटरसायकल क्रमांक MP- 68 -2 C- 3 3 57 ही गाडी व त्यावर दोन संशयित इसम यास ताब्यात घेतले त्यांचे नाव

1) चरण सिंग उखा चव्हाण वय ३६ राहणार चौंडी ता. जिल्हा बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश ) , 2) पंकज रतन सिंग चव्हाण वय २५ राहणार मोरझिरा , ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक गावठी बनावटीचा पिस्तुल व दोन जिवंत काडतुस व दोन मोबाईल असा अंदाजे एक लाख 29 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल विना पास परवाना बेकायदेशीरपणे दहशत निर्माण करण्याची उद्देशाने बाळगताना सापडला . हे सर्व ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध वरणगाव पोलीस स्टेशनला CCTNS No 194/2025 Arm Act 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही डॉ. महेश्वर रेड्डी ,पोलीस अधीक्षक जळगाव, राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गुन्हा शाखा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे ,पोह यशवंत टहाकळे प्रेमचंद सपकाळे प्रीतम पाटील श्रीकृष्ण देशमुख ,बबन पाटील, रवींद्र चौधरी ,सचिन घुगे ,चा पो.हेड . भरत पाटील सर्व मेन स्थानिक गुन्हा शाखा जळगाव यांनी केली.