CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वरणगांव फॅक्टरीत मोठ्या भावाने लहान भावाचा केला निर्घृण खून

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

वरणगांव फॅक्टरीत मोठ्या भावाने लहान भावाचा केला निर्घृण खून

वरणगांव - ( निलेश चौधरी ) - : वरणगांव फॅक्टरीमधील क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा खून झाल्याची घटना बुधवारी दि.११ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २. १५ मि. घडली.या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशीरा मिळालेल्या महितीनुसार मोठ्या भावानेच या मयत प्रदीप जयसिंग इंगळेची हत्या केल्याचे समजते .

वरणगांव आयुध निर्माणी वसाहतीमध्ये क्वार्टर नं. ४४ टाईप थ्री मध्ये मयत प्रदीप जयसिंग इंगळे वय ४५ ते आयुध निर्माण फॅक्टरीमध्ये सुपरवायझर पदावर नोकरीवर होते . ते नेहमीप्रमाणे फॅक्टरीमधे कामावर गेले होते. ते बुधवारी दुपारी जेवणासाठी त्यांच्या निवासस्थानी आले . दुपारी १:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून भांडणाचा जोरात आवाज येवू लागला. संशयितांनी त्यांच्यावर लाकडी बॅट व इतर वस्तूने वार करून खून करण्यात आला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या संदर्भात पोलीसांना माहिती मिळताच वरणगांच पोलीस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी, पो.उप.निरी. गांगुर्डे , सुशील सोनवणे, पोहेकॉ. संदिप बनसोडे, सुखराम सावकारे, होमगार्ड राम चौधरी, महेश चौधरी, घटनास्थळी पोहचले.

सुरक्षा विभाग कर्मचारी व व्यवस्था अधिकारी यांनी सुद्धा भेटी दिल्या. असून फॉरेन्सिक लॅब तर्फे तपासणी करण्यात येणार आहे. भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस करीत आहे.